खानापूर तालुक्यातील मणतुर्गा येथे विजेच्या धक्क्याने महिलेचा मृत्यू 

सकाळ वृत्तसेवा
सोमवार, 13 मे 2019

एक नजर

  • बांधकामाला पाणी मारताना विजेचा धक्का बसून तालुक्यातील मणतुर्गा येथे महिलेचा मृत्यू.
  • आज सकाळी अकराच्या सुमारास घटना. 
  • लक्ष्मी बळीराम देसाई (वय 50) असे मृत महिलेचे नाव. 

खानापूर - बांधकामाला पाणी मारताना विजेचा धक्का बसून तालुक्यातील मणतुर्गा येथे महिलेचा मृत्यू झाला आहे. ही घटना आज सकाळी अकराच्या सुमारास घडली. लक्ष्मी बळीराम देसाई (वय 50) असे मृत महिलेचे नाव आहे. त्यांच्या पश्चात पती, दोन मुलगे आणि एक मुलगी असा परिवार आहे. 

याबाबतची अधिक माहिती अशी, मणतुर्गा येथे बळीराम देसाई यांचे घराचे बाधकाम सुरू आहे. आज सकाळी बांधकामावर त्यांची पत्नी लक्ष्मी या पाणी मारत होत्या. पाण्याच्या मोटरीची वायर सुटल्याने त्यांना विजेचा धक्का बसला.  त्या बाजूच्या पाण्याच्या टाकीवर कोसळल्या. त्यांना तात्काळ खानापूरतील सरकारी रुग्णालयात दाखल करण्यात आले. मात्र उपचारापूर्वीच त्यांचा मृत्यू झाला. या घटनेबद्दल मणतुर्गा येथे हळहळ व्यक्त होत आहे.


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Death of woman with electric shock incidence in Manturga Khanapur district