बेळगावः इंगळीत कर्जबाजारी शेतकऱ्याची आत्महत्या

बेळगावः इंगळीत कर्जबाजारी शेतकऱ्याची आत्महत्या

मांजरी - इंगळी तालुका चिक्कोडी येथील शेतकऱ्याने राहत्या घरी गळफास घेऊन आत्महत्या केल्याची घटना आज सकाळी उघडकीस आली. महादेव शिवाप्पा आंबी असे त्या शेतकऱ्याचे नाव आहे. महादेव याने शेती व्यवसायासाठी सहकारी संस्था व इतर आर्थिक संस्थेतून पंचवीस लाख रुपये कर्ज घेतले होते. ते कसे फेडायचे या चिंतेतूनच त्यांनी आत्महत्या केली. या घटनेची नोंद अंकली पोलिसात झाली असून फौजदार गणपती कोगनोळे हे अधिक तपास करत आहेत. 

याबाबत घटनास्थळाहून मिळालेली माहिती अशी की, महादेव आंबी यांनी शेती व्यवसायासाठी कर्ज घेतले होते. यावर्षी कृष्णा नदी पूर्णपणे कोरडी पडली होती. त्यामुळे पाण्याविना शेतातील पीक पूर्णपणे करपले. झालेल्या आर्थिक नुकसानीमुळे कर्ज फेडणे शक्य नसल्याने त्यांनी राहत्या घरी आज सकाळी गळफास घेऊन आत्महत्या केली.  

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com