तीन महिन्यांमध्ये शालेय सुरक्षा मार्गदर्शक तत्वे आखा : सर्वोच्च न्यायालय

वृत्तसंस्था
मंगळवार, 17 एप्रिल 2018

हरियाणातील गुडगाव येथील रायन इंटरनॅशनल स्कूलच्या स्वच्छतागृहात प्रद्युम्न ठाकूर या सात वर्षीय बालकाचा मृतदेह आढळला होता. या हत्याप्रकरणानंतर देशभरातील सर्व शाळांच्या सुरक्षेवर प्रश्नचिन्ह उपस्थित करण्यात येत होते. त्यानंतर आता सर्वोच्च न्यायालयाने खासगी आणि सरकारी शाळांमधील सुरक्षेच्या दृष्टीने मार्गदर्शक तत्वे आखण्याच्या सूचना केल्या आहेत.

नवी दिल्ली : शालेय विद्यार्थ्यांवर होणाऱ्या अत्याचारांच्या घटना दिवसेंदिवस वाढत आहेत. या सततच्या होणाऱ्या घटनांना लगाम लावण्यासाठी सर्वोच्च न्यायालयाने केंद्राला याबाबत उपाययोजना करण्याच्या सूचना केल्या आहेत. येत्या तीन महिन्यांमध्ये सर्व शाळांच्या सुरक्षेच्या दृष्टीने कोणकोणती मार्गदर्शक तत्वे आखता येतील, याबाबतची सूचना केल्या आहेत. 

Supreme Courts

हरियाणातील गुडगाव येथील रायन इंटरनॅशनल स्कूलच्या स्वच्छतागृहात प्रद्युम्न ठाकूर या सात वर्षीय बालकाचा मृतदेह आढळला होता. या हत्याप्रकरणानंतर देशभरातील सर्व शाळांच्या सुरक्षेवर प्रश्नचिन्ह उपस्थित करण्यात येत होते. त्यानंतर आता सर्वोच्च न्यायालयाने खासगी आणि सरकारी शाळांमधील सुरक्षेच्या दृष्टीने मार्गदर्शक तत्वे आखण्याच्या सूचना केल्या आहेत.

Web Title: Decide school safety guidelines in three months Supreme Court asks Centre