तोंडी तलाक बंदीसाठी निवडणुकीनंतर पावले उचलणार

पीटीआय
सोमवार, 6 फेब्रुवारी 2017

गाझियाबाद - उत्तर प्रदेशच्या विधानसभा निवडणुका झाल्यानंतर तोंडी तलाक बंदीसाठी सरकार पावले उचलू शकते, असे मत केंद्रीय मंत्री रवी शंकर प्रसाद यांनी व्यक्त केले. एका पत्रकार परिषदेत बोलताना त्यांनी या परंपरेमुळे स्त्रीयांचा अपमान होत असून ती बंद करण्याची गरज असल्याचेही सांगितले.

केंद्र सरकार अशा वाईट सामाजिक प्रथा संपुष्टात आणण्यासाठी कटिबद्ध असून याबाबतचा मुद्दा आम्ही सर्वोच्च न्यायालयात उठवणार असल्याचेही त्यांनी या वेळी सांगितले. हा मुद्दा धर्माशी निगडित नसून तो महिलांचा आदर आणि प्रतिष्ठेशी निगडित असल्याचेही ते या वेळी म्हणाले. सरकार एखाद्या प्रथेवर विश्‍वास ठेवेल; परंतु वाईट सामाजिक प्रथा कधीच चालू शकणार नाहीत असे त्यांनी सांगितले. आजच्या घडीला केवळ आमचाच पक्ष महिलांना मान देत असून इतर कोणताही पक्ष महिलांना चांगल्या जागा देत नसून त्यांचा आदरही करत नसल्याचे प्रसाद या वेळी म्हणाले.

या वेळी बोलतान त्यांनी बहुजन समाज पक्षाने जातीचे राजकारण बंद करावे व महिलांचा आदर करावा, असेही सांगितल्याचे समजते.

Web Title: Decision about Oral divorce will taken after election