जयललिता यांच्या मालमत्तेसंबंधी लवकरच निकाल

वृत्तसंस्था
मंगळवार, 7 फेब्रुवारी 2017

नवी दिल्ली : तमिळनाडूच्या दिवंगत मुख्यमंत्री जयललिता यांच्यावर सुरू असलेल्या बेहिशेबी मालमत्ताप्रकरणी सर्वोच्च न्यायालय पुढील आठवड्यात निकाल देण्याची शक्‍यता आहे.

नवी दिल्ली : तमिळनाडूच्या दिवंगत मुख्यमंत्री जयललिता यांच्यावर सुरू असलेल्या बेहिशेबी मालमत्ताप्रकरणी सर्वोच्च न्यायालय पुढील आठवड्यात निकाल देण्याची शक्‍यता आहे.

या निकालाने तमिळनाडूच्या मुख्यमंत्री बनण्याच्या मार्गावर असलेल्या व्ही. के. शशिकला यांचेही भवितव्य निश्‍चित होणार आहे. मद्रास उच्च न्यायालयाने जयललिता आणि शशिकला यांच्यासह सर्वांना निर्दोष ठरविले होते, तर बंगळूरच्या विशेष न्यायालयाने 4 वर्षांची शिक्षा आणि 100 कोटी रुपयांचा दंड ठोठावला होता.

कर्नाटक सरकारने उच्च न्यायालयाच्या निर्णयाला सर्वोच्च न्यायालयात आव्हान दिले होते. न्यायालयाने सुनावणीनंतर आपला निर्णय स्थगित ठेवला होता. सोमवारी कर्नाटक सरकारने सर्वोच्च न्यायालयात लवकर निकाल देण्याची विनंती केल्यानंतर पुढील आठवड्यात निर्णय सुनावला जाईल, असे सांगितले.

Web Title: decision on jayalalitha's wealth soon