येडियुरप्पांच्या मुख्यमंत्रीपदाचा आज निकाल, सर्वोच्च न्यायालयात सुनावणी

वृत्तसंस्था
शुक्रवार, 18 मे 2018

आज या सुनावणीत येडियुरप्पा यांना बहुमताचा आकडा दाखवणारी यादी न्यायालयात सादर करावी लागेल, तसे न झाल्यास त्यांचे सरकार व मुख्यमंत्रीपद धोक्यात येण्याची शक्यता आहे.

नवी दिल्ली : कर्नाटकात सत्तास्थपनेवरून रंगलेले नाट्य आज संपुष्टात येण्याची शक्यता आहे. सत्तास्थापनेविरोधात काँग्रेसने दाखल केलेल्या याचिकेवर आज (ता. 18) सर्वोच्च न्यायालयात सुनावणी होणार आहे. यावेळी काल (ता.17) मुख्यमंत्रीपदाची शपथ घेतलेले भाजपचे मुख्यमंत्री येडियुरप्पा यांना बहुमत सिद्ध करण्यासाठी आवश्यक आमदारांच्या सह्यांची यादी न्यायालयात सादर करावी आहे. 

येडियुरप्पांना बहुमत नसल्याने लोकशाहीविरोधात होणारा त्यांचा शपथविधी रोखण्यासाठी काँग्रेसकडून सर्वोच्च न्यायालयात याचिका दाखल केली गेली होती. पण राज्यपाल वजुभाई वाला यांनी आपले विशेषाधिकार वापरत आम्ही हा शपथविधी रोखू शकत नसल्याचे जाहिर केले. तसेच या याचिकेवर सुनावणी घेण्यात येईल असेही सांगण्यात आले होते.

आज या सुनावणीत येडियुरप्पा यांना बहुमताचा आकडा दाखवणारी यादी न्यायालयात सादर करावी लागेल, तसे न झाल्यास त्यांचे सरकार व मुख्यमंत्रीपद धोक्यात येण्याची शक्यता आहे.

15 दिवसात बहुमत सिद्ध करण्यासाठी भाजपकडून फोडाफोडीचे राजकारणही करण्यात आले. काँग्रेस व जेडीएसच्या आमदारांना पैसे व मंत्रीपदाच्या ऑफरही भाजपने देऊ केल्या. आपले आमदार भाजपच्या जाळ्य़ात ओढले जाऊ नये यासाठी काँग्रेस व जेडीएसकडून आमदारांना अज्ञात स्थळीही ठेवण्यात आले. राज्यपालांनी दिलेला निर्णय हा लोकशाही विरोधी असल्याचे मत या दोन्ही पक्षांकडून व्यक्त केले जात आहे.  
    

Web Title: Decision On Yeddyurappas Appointment of cm In Supreme Court