दीपक मिश्रांवर 'बाह्य दबाव' होता; निवृत्त न्यायाधीशांचा आरोप

सकाळ न्यूज नेटवर्क
सोमवार, 3 डिसेंबर 2018

नवी दिल्ली : माजी सरन्यायाधीश दीपक मिश्रा हे बाहेरील सूत्रांच्या दबावाखाली निर्णय घेत होते. बाह्य दबावाखाली काम केल्यामुळे त्याचा न्यायप्रक्रियेवर परिणाम झाला, असा दावा निवृत्त न्यायाधीश कुरियन जोसेफ यांनी केल्यामुळे खळबळ उडाली आहे.

ऐतिहासिक पत्रकार परिषद घेऊन मिश्रा यांच्याविरोधात आरोप करणाऱ्या चार न्यायाधीशांमध्ये समावेश असलेले जोसेफ हे 29 नोव्हेंबर रोजी निवृत्त झाले आहेत. 

सर्वोच्च न्यायालयातील न्यायाधीशपदावरून निवृत्त झाल्यानंतर जोसेफ यांनी मिश्रा यांच्यावर गंभीर आरोप केले आहेत. सर्वोच्च न्यायालयाचे तत्कालीन चार वरिष्ठ न्यायाधीश, न्या. जे. चेलमेश्वर, न्या. रंजन गोगोई, न्या. जोसेफ आणि न्या. मदन लोकूर यांनी पत्रकार परिषद घेत मिश्रांच्या कार्यपद्धतीवर प्रश्नचिन्ह उपस्थित केले होते. या पत्रकार परिषदेमुळे न्यायव्यवस्थेला हादरे बसले होते. संवेदनशील खटल्यांच्या वाटपात मिश्रा हे पक्षपातीपणा करीत असल्याचा आरोप करीत चारही वरिष्ठ न्यायाधीशांनी मिश्रा यांच्या विरोधात बंड केले होते. 

मिश्रांच्या कार्यपद्धतीवर संशय 
पीटीआयला दिलेल्या मुलाखतींमध्ये जोसेफ यांनी संबंधित पत्रकार परिषदेबद्दल अनेक खुलासे केले. ''बाहेरील सूत्रांच्या दबावाखाली माजी सरन्यायाधीश मिश्रा हे काम करीत होते. बाह्यशक्तींकडून मिश्रा यांच्यावर नियंत्रण ठेवले जात होते. या हस्तक्षेपामुळे न्यायप्रक्रियेवर गंभीर परिणाम झाले. या चार न्यायाधीशांबरोबरच सर्वोच्च न्यायालयाच्या इतरही न्यायाधीशांना मिश्रा यांच्या कार्यपद्धतीवर संशय होता,'' असे जोसेफ म्हणाले. 

पत्रकार परिषदेचा सकारात्मक परिणाम 
बाह्यशक्ती कशा प्रकारे मिश्रा यांना नियंत्रित करीत होत्या? त्याचा कुठल्या प्रकरणांवर परिणाम झाला? याबाबत सविस्तर बोलण्यास जोसेफ यांनी या वेळी नकार दिला. राजकीय पक्ष किंवा सरकारकडून एखाद्या खटल्यात हस्तक्षेप केला जात होता का? असे विचारले असता जोसेफ म्हणाले, ''ही बाब यापुढे नेण्याची माझी इच्छा नाही. त्यामुळे कुठल्याही एका प्रकरणाचा उल्लेख करण्याची आवश्‍यकता नाही. मिश्रा हे पक्षपातीपणे खटल्यांचे वाटप करीत होते, असे न्यायाधीशांचे मत होते.'' न्यायाधीशांच्या पत्रकार परिषदेचा चांगला परिणाम दिसून आला, अशी कबुलीही जोसेफ यांनी दिली.

Web Title: Deepak Misra was under external pressure as CJI, claims kurian joseph