राहुल गांधींचा निर्णय धाडसी : प्रियांका गांधी

वृत्तसंस्था
गुरुवार, 4 जुलै 2019

नवी दिल्ली : राहुल गांधी यांनी काँग्रेसच्या अध्यक्षपदाचा राजीनामा दिला. त्यांच्या या भूमिकेवर त्यांची बहिण आणि काँग्रेसच्या सरचिटणीस प्रियांका गांधी यांनी त्यांना पाठिंबा दिला असून, त्यांचा हा निर्णय धाडसी असल्याचे सांगितले. याबाबतचे ट्विट प्रियांका गांधी यांनी केले आहे. 

राहुल गांधी यांनी आपल्या अध्यक्षपदाचा राजीनामा लिहून पक्षाकडे सोपवला होता. या पत्रामध्ये राहुल गांधी यांनी त्यांची संपूर्ण भूमिका मांडली. लोकसभा निवडणुकीत झालेल्या दारूण पराभवानंतर त्याची जबाबदारी स्वीकारत राहुल गांधी यांनी अध्यक्षपदाचा राजीनामा दिला होता. मात्र, त्यांनी राजीनामा मागे घ्यावा, यासाठी पक्षातील ज्येष्ठ नेत्यांकडून त्यांची मनधरणीही करण्यात आली होती. तरीदेखील त्यांनी आपल्या निर्णयावर ठाम राहत निर्णय मागे घेतला नाही. 

त्यानंतर काल (बुधवार) मी आता काँग्रेस अध्यक्षपदावर नसून, पक्षाच्या कार्यकारी समितीने तातडीने बैठक बोलवून नव्या अध्यक्षाची निवड करावी, असे राहुल गांधी यांनी बुधवारी स्पष्ट केले. 

स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Deepest respect for your decision says Priyanka Gandhi on Rahul Gandhi Decision