मेधा पाटकर यांच्यावर बदनामीचा आरोप निश्‍चित 

सकाळ न्यूज नेटवर्क
मंगळवार, 10 जुलै 2018

नर्मदा बचाव आंदोलनाच्या कार्यकर्त्या मेधा पाटकर यांच्यावर दिल्ली न्यायालयाने अब्रुनुकसानीचा आरोप सोमवारी निश्‍चित केला. खादी आणि ग्रामोद्योग आयोगाचे अध्यक्ष व्ही. के. सक्‍सेना यांनी मेधा पाटकर यांच्यावर हा दावा दाखल केला होता. 

नवी दिल्ली ः नर्मदा बचाव आंदोलनाच्या कार्यकर्त्या मेधा पाटकर यांच्यावर दिल्ली न्यायालयाने अब्रुनुकसानीचा आरोप सोमवारी निश्‍चित केला. खादी आणि ग्रामोद्योग आयोगाचे अध्यक्ष व्ही. के. सक्‍सेना यांनी मेधा पाटकर यांच्यावर हा दावा दाखल केला होता. 

एका खासगी वृत्तवाहिनीवरून पाटकर यांनी 2006मध्ये आपली बदनामी केल्याची तक्रार सक्‍सेना यांनी केली आहे. त्यावरून महादंडाधिकारी निशांत गर्ग यांनी पाटकर यांच्यावर आरोपनिश्‍चिती केली आहे. नर्मदा बचाव आंदोलन व मेधा पाटकर यांच्याविरोधात जाहिरात प्रसिद्ध केल्याचा आरोप करून पाटकर यांनी सक्‍सेना यांच्याविरोधात 2000मध्ये खटला दाखल केला. तेव्हापासून त्या दोघांमध्ये कायदेशीर लढा सुरू आहे. सक्‍सेना हे त्या वेळी अहमदाबाद येथील "नॅशनल कौन्सिल फॉर सिव्हिल लिबर्टिज' या सामाजिक संस्थेचे अध्यक्ष होते. 

सक्‍सेना यांनीही मेधा पाटकर यांच्याविरोधात खटला दाखल केला होता. खासगी वृत्तवाहिनीवरील कार्यक्रमात पाटकर यांनी आपल्याविरोधात अपमानकारक वक्तव्य केले असल्याचा आरोप करीत त्यांनी पाटकर यांच्या विरोधात दोन फिर्यादी केल्या आहेत. 

Web Title: Defamation Charges Against Medha Patkar