भाजपला हरविण्यासाठी विरोधकांनी एकत्र यावे : दिग्विजय सिंह

पीटीआय
शुक्रवार, 27 एप्रिल 2018

आगामी 2019च्या निवडणुकीत भारतीय जनता पक्षाला हरविण्यासाठी सर्व विरोधी पक्षांनी एकत्र यावे, असे आवाहन कॉंग्रेसचे ज्येष्ठ नेते दिग्विजय सिंह यांनी केले. त्याशिवाय बिहार आणि पश्‍चिम बंगालसारखे छोट्या क्षेत्रीय पक्षांना एकत्र आणण्याचे काम मोठ्या भावासारखे आपला पक्ष करेल, असेही त्यांनी स्पष्ट केले. 

नवी दिल्ली : आगामी 2019च्या निवडणुकीत भारतीय जनता पक्षाला हरविण्यासाठी सर्व विरोधी पक्षांनी एकत्र यावे, असे आवाहन कॉंग्रेसचे ज्येष्ठ नेते दिग्विजय सिंह यांनी केले. त्याशिवाय बिहार आणि पश्‍चिम बंगालसारखे छोट्या क्षेत्रीय पक्षांना एकत्र आणण्याचे काम मोठ्या भावासारखे आपला पक्ष करेल, असेही त्यांनी स्पष्ट केले. 

सिंह म्हणाले, की भाजपचा "धार्मिक कट्टरतावाद' हा सर्व विरोधी पक्षांना एकत्र आणू शकतो आणि कॉंग्रेस हा सर्वांत मोठा पक्ष असून, भाजपला हरविण्यासाठी विरोधकांबरोबर काम करण्यास तयार आहे. भाजपला हरविण्यासाठी सर्व विरोधी पक्षांनी एकत्र येणे गरजेचे असून, मार्क्‍सवादी कम्युनिस्ट पक्षाने कॉंग्रेससोबत येण्यास अनुकूलता दर्शविली आहे, असेही सिंह म्हणाले. माकपच्या हैदराबादमध्ये झालेल्या बैठकीत सीताराम येचुरी यांची पुन्हा निवड करण्यात आली असून, ते मुख्य विरोधी पक्षांबरोबर काम करण्यास तयार आहेत. धार्मिक कट्टरतावादामुळे सर्व विरोधी पक्षांचा भाजपला विरोध आहे. 

Web Title: For Defeat BJP Oppositions should come forward says Digvijay Singh