डोकलाम वादावर भारत 'अलर्ट अॅन्ड रेडी' - संरक्षणमंत्री निर्मला सितारमन

सकाळ वृत्तसेवा
सोमवार, 26 मार्च 2018

'भारत कोणत्याही परिस्थितीला तोंड देण्यासाठी सज्ज आहे. आम्ही आमचे क्षेत्र रक्षण आणि अखंडत्व अबाधित राहण्यासाठी सदा तत्पर आहोत.' - संरक्षणमंत्री निर्मला सितारमन

देहरादून - चीन सोबत डोकलाम बॉर्डर बाबत असलेला वाद चांगलाच टोकाला गेला असल्याची परिस्थिती निर्माण झाली आहे. त्यामुळे भारत हा ही परिस्थिती हाताबाहेर गेलीच तर ती हाताळण्यासाठी 'अलर्ट अॅन्ड रेडी' (सावध आणि तयार) आहे, असे देशाच्या संरक्षणमंत्री निर्मला सितारमन यांनी रविवारी म्हटले आहे. 

भारत-भूतान-चीन त्रिकोणी जंक्शन जवळ डोकलाम पठार येथे गेल्या वर्षी जून ते ऑगस्ट 2017 दरम्यान भारतीय आणि चीनी सैन्य 74 दिवस अमोरासमोर आले होते. या अडचणीवर दोन्ही देशांकडून चर्चेतून मार्ग काढण्यात येईल, अशा अटीवर हा फेस ऑफ ऑगस्ट नंतर मागे घेण्यात आला. 

उत्तराखंडचे मुख्यमंत्री त्रिवेन्द्रसिंग रावत यांच्या देहरादून येथील निवासस्थानातील एका कार्यक्रमात सीतारामन यांनी डोकलाम आणि अरुणाचल प्रदेशमधील चीनच्या हस्तक्षेपाबाबत एका प्रश्नाचे उत्तर देताना म्हटले की, 'भारत कोणत्याही परिस्थितीला तोंड देण्यासाठी सज्ज आहे. आम्ही आमचे क्षेत्र रक्षण आणि अखंडत्व अबाधित राहण्यासाठी सदा तत्पर आहोत.'

आम्ही सतत आपल्या सैन्याचा सर्वपरीने विकास व्हावा यासाठी काम करीत आहोत. नॅशनल डिफेन्स अकॅडमी आणि इंडियन मिलिटरी अकॅडमीसाठी निवडलेल्या उमेदवारांशी बोलत असताना सीतारामन म्हणाल्या की, तयारीच्या दृष्टीने आवश्यक असलेला दारुगोळा खरेदी करण्यास आणि एखाद्या आणीबाणीच्या परिस्थितीत निर्णय घेण्यासाठी सैन्याला सरकारकडून स्वातंत्र्य देण्यात आले आहे. 

शनिवारी बीजिंगमधील भारतीय राजदूत गौतम बमबावळे यांनी मोदी चीनला शांघाय सहकार संघटनेच्या शिखर परिषदेसाठी भेट देणार असल्याचे स्पष्ट केले आणि दोन्ही देशांमधील चांगला संवाद साधण्याच्या गरजेवर जोर दिला. 

Web Title: Defence minister Nirmala Sitharamans tough talk on Doklam issue