Breaking : राजधानीतील इस्त्रायल दूतवास परिसरात बॉम्बस्फोट

सकाळ ऑनलाईन टीम
Friday, 29 January 2021

ज्या परिसरात बॉम्ब हल्ला झाला त्या परिसरात उभ्या असलेल्या वाहनांचे नुकसान झाले आहे.

Delhi Explosion reported at Aurangzeb Road : राजधानी दिल्ली येथील औरंगजेब रोडवरील इस्त्रायलच्या दूतवास कार्यालयाजवळ बॉम्बस्फोट झाल्याचे वृत्त समोर आले आहे. दिल्ली पोलिसांनी बॉम्ब स्फोट झाल्याच्या वृत्ताची पुष्टी केली आहे. या स्फोटात कोणतीही जिवीत हानी झाल्याचे वृत्त अद्याप समोर आलेले नाही. ज्या परिसरात बॉम्ब हल्ला झाला त्या परिसरात उभ्या असलेल्या वाहनांचे नुकसान झाले आहे. विशेष पथक घटनास्थळी दाखल झाले असून परिसर पूर्णत: सील करण्यात आला आहे.  

मिळालेल्या माहितीनुसार, शुक्रवारी दिल्लीस्थित इस्त्रायल दूतावासाजवळ बॉम्बस्फोट झाला. या घटनेनंतर परिसरात एकच खळबळ माजली. दिल्ली पोलिस आणि अग्नीशमन दलाला जवळपास 5:45 वाजता घटनेची माहिती मिळाली. या घटनेची माहिती मिळताच स्थानिक पोलिस आणि अग्नीशमन दलाचे जवान तात्काळ घटनास्थळी दाखल झाले.

विशेष पोलिस पथक, गुन्हे अन्वेषण विभागाचे अधिकारी तसेच गुप्तचर विभागाचे अधिकारी देखील घटनास्थळी पोहचले आहेत. यापूर्वी 13 फेब्रुवारी 2012 रोजी दिल्लीस्थित इस्त्रायल दूतावासातील एका कारवर बॉम्ब हल्ला करण्यात आला होता. या हल्ल्यात इस्त्रायलचे राजन्यायिक अधिकारी ताल येहोशुआण आणि चालकासह चार जण गंभीर जखमी झाले होते. याप्रकरणात त्यावेळी एकाला अटकही झाली होती.


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Delh Explosion reported at Aurangzeb Road near Israel Embassy