दिल्ली: किशोरवयीन मुलीची गोळ्या घालून हत्या

वृत्तसंस्था
बुधवार, 21 डिसेंबर 2016

नवी दिल्ली : राजधानी दिल्लीतील नजाफगढ परिसरात मंगळवारी रात्री अज्ञात व्यक्तींनी एका किशोरवयीन मुलीची गोळ्या घालून हत्या केल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे.

नवी दिल्ली : राजधानी दिल्लीतील नजाफगढ परिसरात मंगळवारी रात्री अज्ञात व्यक्तींनी एका किशोरवयीन मुलीची गोळ्या घालून हत्या केल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे.

मंगळवारी नजाफगढमधील दीपक विहार येथे राहणारी सिमरन आपल्या दोन मित्रांसोबत दुपारच्या जेवणासाठी बाहेर गेली होती. उद्यानातून घरी जाताना सर्वजणी काही कामासाठी द्वारका परिसरात थांबल्या. रात्री साडे सातच्या आसपास सिमरनच्या आईने तिचा शोध घेण्यास सुरुवात केली. त्यानंतर काही वेळातच सिमरनच्या आईला बंदुकीच्या गोळीचा आवाज आला. ज्यावेळी आई घराच्या खाली आली त्यावेळी तेथे सिमरन रक्‍ताच्या थारोळ्यात पडल्याचे दिसले. त्यानंतर तिला रुग्णालयात नेण्यात आले. मात्र तेथे तिला मृत घोषित करण्यात आले.

'सिमरनला तिच्या दोन मित्रांनी गाडीतून घराजवळ सोडले. त्यावेळी तिच्यासोबत एक मुलगा होता. त्यानंतर बंदुकीचा आवाज आला आणि सिमरन रक्‍ताच्या थारोळ्यात पडल्याचे दिसले', अशी माहिती सिमरनच्या आईने दिली. सिमरनसोबत असलेला मित्र गायब झाला आहे. पोलिस त्याचा शोध घेत आहेत. घटनास्थळावरून हत्यारे जप्त करण्यात आली आहेत. पोलिस पुढील तपास करत आहेत.

Web Title: Delhi: 17-year old shot dead in Najafgarh