दिल्लीत 'आप'च्या आमदाराचा भाजपमध्ये प्रवेश

वृत्तसंस्था
सोमवार, 27 मार्च 2017

भाजपचे दिल्लीचे अध्यक्ष मनोज तिवारी यांच्या उपस्थितीत वेदप्रकाश यांनी भाजपमध्ये प्रवेश केला. दिल्लीत पुढील महिन्यात महानगरपालिकेच्या निवडणुका होणार आहेत.

नवी दिल्ली - दिल्लीतील आम आदमी पक्षाचे (आप) आमदार वेदप्रकाश सतिश यांनी आज (सोमवार) भाजपमध्ये प्रवेश केला. 

आगामी महापालिका निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर वेदप्रकाश यांनी भाजपमध्ये प्रवेश केल्याने 'आप'ला मोठा झटका बसला आहे. 'आप'ने 2015 मध्ये झालेल्या विधानसभा निवडणुकीदरम्यान दिलेली आश्वासने पूर्ण केली नसल्याने पक्षाच्या सदस्यत्वाचा राजीनामा देत असल्याचे वेदप्रकाश यांनी सांगितले. त्यांनी आपल्या आमदारकीचाही राजीनामा विधानसभा अध्यक्षांकडे पाठविला आहे. 'आप'मधील 35 आमदार पक्षाच्या कामकाजामुळे नाराज आहेत, असे त्यांनी सांगितले.

भाजपचे दिल्लीचे अध्यक्ष मनोज तिवारी यांच्या उपस्थितीत वेदप्रकाश यांनी भाजपमध्ये प्रवेश केला. दिल्लीत पुढील महिन्यात महानगरपालिकेच्या निवडणुका होणार आहेत. दिल्लीत आप आणि भाजप यांच्यात कडवी लढत होणार आहे.

Web Title: Delhi: AAP MLA Ved Prakash joins BJP, to resign from assembly