esakal | दिल्लीकरांना मिळणार घरपोच ऑक्सिजन
sakal

बोलून बातमी शोधा

Arvind Kejriwal

दिल्लीकरांना मिळणार घरपोच ऑक्सिजन

sakal_logo
By
सकाळ न्यूज नेटवर्क / वृत्तसंस्था

नवी दिल्ली - कोरोना (Corona) संकटात (Disaster) ऑक्सिजन (Oxygen) तुटवड्याचा अनुभव घेणाऱ्या दिल्लीकरांना राज्य सरकारने (State Government) घरपोच (Home Delivery) ऑक्सिजन सिलिंडर पुरवण्यासाठी एक नवी योजना सुरू केली आहे. घरातच विलगीकरणात राहणाऱ्या कोरोना रुग्णांना https://delhi.gov.in पोर्टलवर नोंदणी करावी लागेल. (Delhi Citizens will get Home delivery oxygen)

रुग्णालयांमधील गंभीर स्थिती आणि रुग्णांना सामावून घेण्याची क्षमता संपल्यामुळे घरातच राहणाऱ्या रुग्णांना ऑक्सिजनची आवश्यकता पडली तर वणवण हिंडावे लागू नये, यासाठी राज्य सरकारने घरपोच ऑक्सिजन पुरवठा योजना सुरू करण्याचे ठरवले आहे. यासाठी नोंदणी करणाऱ्यांना आधार कार्ड, वैध ओळखपत्र आणि कोरोना पॉझिटिव्ह असल्याबाबतचे डॉक्टरचे प्रमाणपत्र जोडावे लागेल.

ऑक्सिजन पुरवठ्याबाबत केंद्राची अनास्था?

दिल्लीला रोज ७०० मेट्रिक टन ऑक्सिजनचा पुरवठा करण्याच्या राज्य सरकारच्या मागणीबाबत केंद्र सरकार अजूनही अनिच्छुक दिसत आहे. सर्वोच्च न्यायालयात आज केंद्रातर्फे सांगण्यात आले की, दिल्लीतील ५० मोठ्या रुग्णालयांचे सर्वेक्षण केले, तेव्हा या सर्व रुग्णालयांमध्ये पुरेसा साठा असल्याचे संबंधित व्यवस्थापनाकडून सांगण्यात आले.