विषारी धुरक्यामुळे दिल्लीतील 1800 शाळा बंद

वृत्तसंस्था
शनिवार, 5 नोव्हेंबर 2016

दिल्लीच्या हवेत प्रदूषणाच्या पातळीत सतत वाढ होत आहे. राष्ट्रीय हरित लवादानेही दिल्ली सरकारला या मुद्द्यावरुन फटकारले आहे. प्रदूषण रोखण्यासाठी तातडीने पाऊले उचलण्याचे आदेश लवादाने दिले आहेत.

नवी दिल्ली - राजधानी दिल्लीमध्ये गेल्या काही दिवसांत पसरलेल्या विषारी धुरक्यामुळे आज (शनिवार) सुमारे 1800 शाळा बंद ठेवण्यात आल्या आहेत. मुलांच्या आरोग्यासाठी धोकादायक असल्याने हा निर्णय घेण्यात आला आहे.

दिवाळी आणि वाहनांच्या प्रदूषणानंतर दिल्ली काळ्या धुरक्याच्या चादरीखाली गडप झाली आहे. विशेष म्हणजे नागरिकांना यामुळे श्वास घेणेही अवघड झाले आहे. यामुळे दिल्लीतील सर्व सरकारी शाळांना सुट्टी जाहीर करण्यात आली आहे. गुरुग्राममधल्या शाळांना 3 दिवसांची सुट्टी देण्यात आली आहे. दिल्लीच्या इतिहासातील हे 17 वर्षातील सर्वांत धोकादायक धुरके आहे. त्यामुळे सर्वांचीच चिंता वाढली आहे. 

दिल्लीच्या हवेत प्रदूषणाच्या पातळीत सतत वाढ होत आहे. राष्ट्रीय हरित लवादानेही दिल्ली सरकारला या मुद्द्यावरुन फटकारले आहे. प्रदूषण रोखण्यासाठी तातडीने पाऊले उचलण्याचे आदेश लवादाने दिले आहेत. लाखो विद्यार्थ्यांच्या आरोग्याची काळजी करत शाळा बंद ठेवण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. 

Web Title: Delhi Closes Over 1,800 Schools in Response to Dangerous Smog