केजरीवालांचे आंदोलन मागे 

सकाळ न्यूज नेटवर्क
बुधवार, 20 जून 2018

तब्बल नऊ दिवसांनंतर दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांनी आज नायब राज्यपाल अनिल बैजल यांच्या कार्यालयातील ठिय्या आंदोलन मागे घेतले, खुद्द उपमुख्यमंत्री मनीष सिसोदिया यांनी आज ही माहिती दिली. प्रशासकीय अधिकारी कामावर परतू लागल्यानेच त्यांनी निर्णय घेतल्याचे सिसोदिया यांनी सांगितले.

नवी दिल्ली : तब्बल नऊ दिवसांनंतर दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांनी आज नायब राज्यपाल अनिल बैजल यांच्या कार्यालयातील ठिय्या आंदोलन मागे घेतले, खुद्द उपमुख्यमंत्री मनीष सिसोदिया यांनी आज ही माहिती दिली. प्रशासकीय अधिकारी कामावर परतू लागल्यानेच त्यांनी निर्णय घेतल्याचे सिसोदिया यांनी सांगितले.

प्रशासकीय अधिकाऱ्यांचा संप आणि घरपोच रेशन योजनेच्या मुद्यावरून केजरीवाल आणि त्यांचे सहकारी मंत्र्यांनी अकरा जूनपासून हे आंदोलन सुरू केले होते. दरम्यान, सिसोदिया यांनी मात्र आम्ही आंदोलन करत नव्हतो, तर नायब राज्यपालांच्या भेटीची प्रतीक्षा करत होतो, असे म्हटले आहे. तत्पूर्वी, दिल्ली न्यायालयानेही सोमवारी केजरीवालांवर ताशेरे ओढत तुम्ही लोकांच्या घरात घुसून कसे काय आंदोलन करता, असा सवाल केला होता. 

Web Title: Delhi CM Arvind Kejriwal Leaves LGs Office As Protest Ends