धान्य गैरव्यवहार ; केजरीवालांची सीबीआय चौकशीची शिफारस

वृत्तसंस्था
बुधवार, 4 एप्रिल 2018

'कॅग'चा अहवाल आल्यानंतर धान्य गैरव्यवहार झाल्याचे समोर आले आहे. त्यानंतर दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांनी यातील आरोपींवर कडक कारवाई करण्याचे आदेश दिले आहेत.

नवी दिल्ली : 'कॅग'चा अहवाल आल्यानंतर धान्य गैरव्यवहार झाल्याचे समोर आले आहे. त्यानंतर दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांनी यातील आरोपींवर कडक कारवाई करण्याचे आदेश दिले आहेत. यामध्ये अपहार करणाऱ्यांना कडक शिक्षा करण्यात येईल. याशिवाय कॅगच्या अहवालातही जो गैरप्रकार झाल्याचे समोर आले त्याबाबत केंद्रीय अन्वेषण विभागाला (सीबीआय) चौकशीची शिफारस करण्यात आली आहे.

delhi ration

तसेच कॅगच्या या अहवालात सांगण्यात आले, की भारतीय खाद्य निगमच्या गोदामांपासून सरकारी धान्य पुरवठा दुकानांपर्यंत जाणाऱ्या स्कूटर, मोटारसायकल, ऑटो आणि बस यांसारख्या वाहनांच्या क्रमांकाची नोंद करण्यात आली. कॅगच्या अहवालानुसार बनावट मोबाईल क्रमांकावर एसएमएस अलर्ट पाठविण्यात येत आहेत. उपमुख्यमंत्री मनीष सिसोदिया यांनी याबाबतचा अहवाल विधानसभेत सादर केला. तसेच केजरीवालांनी यातील आरोपींवर कडक कारवाई करण्याचे आदेश दिले आहेत. 

Web Title: Delhi CM Arvind Kejrival Ration Scam Enquiry demanded