मुख्यमंत्र्यांनी शब्द पाळला; नागरिकांना मिळणार मोफत इंटरनेट!

Arvind-Kejriwal
Arvind-Kejriwal

नवी दिल्ली : दिल्लीतील आगामी विधानसभा निवडणुकीच्या पार्श्‍वभूमीवर मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांनी दिल्लीवासीयांसाठी मोफत 'वायफाय'ची घोषणा बुधवारी (ता.4) केली. यामुळे नागरिकांना प्रत्येक महिन्याला 15 जीबी डेटा मोफत मिळणार आहे.

योजनेसाठी राजधानीत 11 हजार हॉटस्पॉट उभे करण्याचे काम वेगाने सुरू आहे. पुढील आठवड्यात म्हणजे 16 डिसेंबर रोजी 100 हॉटस्पॉट कार्यान्वित होणार असून या योजनेचा लाभ मिळण्याची शक्‍यता आहे.

केजरीवाल म्हणाले, '' मोफत वायफाय योजनेच्या घोषणेने आम आदमी पक्षाने 2015 च्या विधानसभा निवडणुकीतील जाहिरनाम्यात दिलेली सर्व आश्‍वासने पूर्ण केली आहेत. किमान डेटाचा वापर ही आता नागरिकांनी दैनंदिन गरज झाली आहे. मोफत 'वायफाय'मुळे विद्यार्थ्यांना मदत होणार असून आरोग्य व शिक्षण क्षेत्राला लाभ होणार आहे.'' 

''शहरातील 11 हजार हॉटस्पॉटपैकी चार हजार हॉटस्पॉट बस स्थानकावर व अन्य सात हजार बाजारपेठा, रहिवासी कल्याण संस्था तसेच इतर ठिकाणी उभारण्यात येणार आहे. प्रत्येक विधानसभा मतदारसंघात 100 हॉटस्पॉट असतील. या योजनेसाठी सुमारे 100 कोटी रुपये खर्च येणार आहे. पहिल्या टप्प्यातील 100 हॉटस्पॉटचे उद्‌घाटन 16 डिसेंबरला झाल्यानंतर प्रत्येक आठवड्यात 500 हॉटस्पॉट उभारले जातील. अशा पद्धतीने पुढील सहा महिन्यांत सर्व 11 हजार हॉटस्पॉटचे काम पूर्ण होईल,'' असे केजरीवाल यांनी सांगितले. 

या योजनेबद्दल माहिती देताना ते म्हणाले की, 'वायफाय' योजना ही भाडेतत्त्वावर आधारित असेल. प्रत्येक हॉटस्पॉटचे मासिक भाडे संबंधित कंपन्यांना सरकार देणार आहेत. उभारणीचे काम पूर्ण झाल्यावर प्रत्येक हॉटस्पॉटकडून दहा मीटर क्षेत्रात इंटरनेट सेवा पुरविणार आहे. यातून एका व्यक्तीला दर महिन्याला 15 जीबी किंवा दररोज दीड जीबीचा वापर करता येईल. इंटरनेटचा सर्वसाधारण वेग 100 ते 150 एमबीपीएस असेल. काही भागात 200 एमबीपीएस एवढा कमाल वेग मिळेल. 

केजरीवाल म्हणाले... 
- नागरिकांना 'ऍप'द्वारे स्वतःची माहिती (केवायसी) भरता येईल. 
- 'ओटीपी'द्वारे कनेक्‍शन सुरू होईल. 
- एका हॉटस्पॉटवरुन एकाच वेळी 150 ते 200 नागरिकांना इंटरनेट वापरता येईल 
- संपूर्ण नेटवर्कमधून एका वेळी 22 लाख नागरिकांना लाभ मिळेल 
- एक हॉटस्पॉट सोडून दुसरा वापरण्याची प्रक्रिया आपोआप होईल 
- 'आप' 2015 मध्ये सत्तेवर आल्यानंतर लगेचच ही योजना जाहीर झाली होती. मात्र त्याच्या अमलबजावणीला विविध कारणांमुळे उशीर झाला. 

मोफत वायफाय : 11,000 एकूण हॉटस्पॉट 

15 जीबी : उपलब्ध मासिक डेटा 

22 लाख : एका वेळी वापरकर्त्यांची संख्या 

100 कोटी रु : उभारणीसाठी खर्च 

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Esakal Marathi News
www.esakal.com