धक्कादायक! 'या' राज्याच्या मुख्यमंत्र्यांमध्ये दिसून आली कोविड-19 ची लक्षणे

Delhi CM Arvind Kejriwal May infected with corona
Delhi CM Arvind Kejriwal May infected with corona

नवी दिल्ली- जगासह देशात कोरोना विषाणू महामारीने थैमान घातले आहे. देशात आतापर्यंत अडीच लाखांपेक्षा अधिक लोकांना कोरोनाची बाधा झाली आहे. अशात दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांना रविवारी दुपारपासून ताप आणि खोकल्याची समस्या जाणवू लागली आहे. त्यामुळे त्यांची मंगळवारी सकाळी कोविड-19 ची चाचणी घेतली जाणार आहे. डॉक्टरांनी केजरीवाल यांना कोविड-19 चाचणी घेण्यापूर्वी एक दिवस थांबण्याचा सल्ला दिला आहे. त्यामुळे केजरीवाल यांनी स्वत:ला विलगीकरणात ठेवले आहे.

पुण्याच्या बातम्या वाचण्यासाठी येथे  क्लिक करा

देशाने कोरोनाबाधितांच्या संख्येत 2.56 लाखांचा आकडा पार केला आहे. तसेच रविवारी एका दिवसातील सर्वाधिक 9,983 कोरोनाग्रस्तांची नोंद झाली आहे. गेल्या काही दिवसांपूर्वी दररोज 9 हजारांपेक्षा अधिक कोरोनाबाधित रुग्णांची नोंद होत आहे. त्यामुळे देशासमोरील चिंता वाढली आहे. देशात कोरोनामुळे मृत्यू झालेल्यांची संख्या 7,135 वर गेली आहे. तर गेल्या 24 तासात 206 रुग्णांचा मृत्यू झाला आहे. समाधानाची बाब म्हणजे आतापर्यंत 1,24,085 रुग्णांनी कोरोनावर यशस्वीरित्या मात केली आहे. त्यामुळे कोरोना विषाणूतून बरे होणाऱ्यांचा दर 50 टक्क्यांच्या जवळ गेला आहे.

-----------
जम्मू-काश्मीरमध्ये पुन्हा चकमक; चार दहशतवाद्यांचा खात्मा 
-----------
सोनू सूद मातोश्रीवर; उद्धव ठाकरे, आदित्य ठाकरे यांच्याशी चर्चा
-----------
रविवारपासून अरविंद केजरीवाल यांच्यात कोरोनासदृष्य लक्षणं दिसून येत आहेत. त्यामुळे त्यांना आता कोविड-19 चाचणीला सामोरं जावं लागणार आहे. सध्या ते विलगीकरण कक्षात आहेत. दोन महिन्यांपेक्षा अधिकच्या कडकडीत टाळेबंदीनंतर आता काही निर्बंध शिथिल करण्यात आले आहेत. त्यामुळे दिल्लीमध्येही कोरोनाबाधितांची संख्या वाढू लागली आहे. आता थेट मुख्यमंत्र्यांना कोविड-19 ची लक्षणे दिसून आल्याने चिंता वाढली आहे.

मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांनी दिल्लीमध्ये अनेक निर्बंध शिथिल केले होते. त्यामुळे मोठ्या प्रमाणात लोक रस्त्यावर येऊ लागली होती. दिल्लीमध्ये आतापर्यंत 28,000 कोरोनाबाधित रुग्णांची नोंद झाली आहे. तर आतापर्यंत 761 जणांचा कोरोना विषाणूमुळे मृत्यू झाला आहे. तसेच आतापर्यंत 10,664 लोकांनी कोरोनावर मात केली आहे. कोरोना विषाणू भयंकर रुप धारण करत असताना अरविंद केजरीवाल यांच्यात कोविड-19 ची लक्षणं दिसू लागल्याने दिल्लीकर चिंतेत आहेत. उद्या(मंगळवारी) केजरीवाल यांचा काय रिपोर्ट येतो याकडे देशाचं लक्ष असणार आहे.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com