केजरीवालांची मोटार गाझियाबादमध्ये सापडली

वृत्तसंस्था
शनिवार, 14 ऑक्टोबर 2017

निळ्या रंगाची ही मोटार 2015 च्या विधानसभा निवडणुकीपर्यंत केजरीवाल वापरत होते. केजरीवाल यांच्या सामान्य माणसाच्या प्रतिमेशी या मोटारीची अनेकवेळा समर्पक तुलना करण्यात आली होती. सध्या या मोटारीचा वापर आम आदमी पक्षाचे कार्यकर्ते करीत होते.

नवी दिल्ली : दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांची चोरी झालेली वॅगन आर मोटार उत्तर प्रदेशातील गाझियाबादमध्ये सापडली. दिल्ली मंत्रालयासमोरुन गुरुवारी मोटार चोरीस गेली होती.

निळ्या रंगाची ही मोटार 2015 च्या विधानसभा निवडणुकीपर्यंत केजरीवाल वापरत होते. केजरीवाल यांच्या सामान्य माणसाच्या प्रतिमेशी या मोटारीची अनेकवेळा समर्पक तुलना करण्यात आली होती. सध्या या मोटारीचा वापर आम आदमी पक्षाचे कार्यकर्ते करीत होते. ही मोटार मंत्रालयासमोर लावण्यात आली होती. गुरुवारी दुपारी 1 वाजता ती चोरीला गेल्याचे निदर्शनास आले. ही मोटार केजरीवाल यांना कुंदन शर्मा या संगणक अभियंत्याने जानेवारी 2013 मध्ये भेट दिली होती. 

पोलिसांना गाझियाबादमध्ये ही मोटार आढळून आली. या मोटारीची चोरी करणाऱ्यांचा शोध पोलिस घेत आहेत. घटनास्थळाहून कोणालाही अटक करण्यात आलेली नाही. 

Web Title: Delhi CM Arvind Kejriwal's stolen blue Wagon-R recovered from Ghaziabad