
Crime News : 30 हून अधिक मुलींवर अत्याचार करून हत्या, सीरियल किलरला जन्मठेपेची शिक्षा
Pune Crime News : दिल्लीच्या रोहिणी कोर्टाने सीरीयल किलर रवींद्र कुमारला ६ वर्षांच्या मुलीचे अपहरण, लैंगिक शोषण आणि हत्येप्रकरणी जन्मठेपेची शिक्षा सुनावली आहे.
दिल्लीतील रियल किलर रवींद्र कुमारवर अल्पवयीन मुलींची हत्या आणि अत्याचाराचा आरोप होता. २००८ ते २०१५ या कालावधीत ३० मुलींचे अपहरण करून त्यांची हत्या केल्याचा आरोप त्याच्यावर होता
२००८ ते १५ या वर्षात दिल्ली, हरियाणा आणि उत्तर प्रदेशमध्ये गुन्ह्यांसाठी दोषी असल्याची कबूली यापूर्वी रवींद्र कुमारने दिली होती. आठ वर्षे चाललेल्या खठल्यात न्यायालयाने त्याला दोषी ठरवले आहे.
रवींद्र दिल्लीत काम करत होता. अमली पदार्थांचे सेवन करुन तो अश्लील चित्रपट पाहायचा, हॉरर चित्रपट तो पाहत असे. त्यानंतर मुलींवर लैंगिक अत्याचार करुन हत्या करायचा. १८ वर्षाचा असतांनी त्याने पहिला गुन्हा केला. २००८ ते १५ पर्यंत त्याने ३० मुलांची हत्या केली.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, रविंद्र हा दिवसभर मजूर म्हणून काम करायचा आणि संध्याकाळी दारूच्या नशेत असायचा. रात्री ८ ते मध्यरात्री झोपडपट्टीतल्या खोलीत तो झोपायचा, उठायचा आणि मुलींच्या शोधात जायचा. (Delhi Crime News)
रविंद्र कधी-कधी बांधकामाच्या ठिकाणी आणि झोपडपट्ट्यांमध्ये ४० किलोमीटरपर्यंत फिरत असे आणि मुलींचा शोध घेत असे. तो मुलांना १० रुपयांच्या नोटा आणि चॉकलेटचे आमिष दाखवून एका निर्जनस्थळी घेऊन जायचा. त्याने अत्याचार केलेल्या मुलींमध्ये सर्वात लहान पीडित ६ वर्षांची आणि सर्वात मोठी १२ वर्षांची होती.
पोलिसांना तो सतत चकवा देत असे त्यामुळे त्याचा आत्मविश्वास वाढला आणि त्याने त्याचे कृत्य सुरूच ठेवले. पकडल्या जाण्याच्या भीतीने तो नवीन मुलींचा शोध घेत होता. दरम्यान न्यायालयाने त्याला जन्मठेपेची शिक्षा सुनावली आहे.