Delhi Crime: पालकांनो मुलांवर लक्ष ठेवा!खेळताना दोन चिमुकले लाकडी बॉक्समध्ये शिरले अन् तासाभरानं...

दिल्ली पोलिसांनी याप्रकरणी कायदेशीर पाऊल उचललं असून सर्व शक्यता तपासल्या जात आहेत.
Crime
Crimesakal

नवी दिल्ली : लहान मुलांना खेळताना बारीक लक्ष ठेवणं का गरजेचं असतं? हे तुम्हाला एका धक्कादायक घटनेतून लक्षात येईल. दक्षिण दिल्लीतील जोगा भाई एक्स्टेंशन भागात मंगळवारी एका 8 वर्षांच्या मुलाचा आणि त्याच्या 6 वर्षांच्या बहिणीचा मृतदेह एका लाकडी बॉक्समध्ये आढळून आला. हे दोघेही या बॉक्समध्ये खेळण्यासाठी गेल्यानंतर तासाभरात ही घटना समोर आली. (Delhi Crime Two toddlers entered a wooden box while playing and after an hour found dead)

पोलिसांच्या माहितीनुसार, नीरज आणि आरती अशी या दोन्ही मृत्यू झालेल्या चिमुकल्यांची नावं आहेत. ते आपल्या घराजवळच खेळत होते. खेळताना ते एका लाकडी बॉक्समध्ये शिरले आणि त्यात अडकून पडले. त्यानंतर तासाभरानं त्यांचे मृतदेहच त्या जागी आढळले. दरम्यान, गुन्हे तपास पथकानं सांगितलं की, या दोघा भावंडांचा अपघातानं श्वास गुदमरुन मृत्यू झाला आहे. पण पोलीस या घटनेतील इतर शक्यताही जसं की हत्येचा काही प्रकार आहे का? हे देखील तपासत आहेत. (Latest Marathi News)

Crime
Sharad Pawar: देशातील धर्मांतराच्या घटनांवर पवारांचं सडेतोड भाष्य; सौहार्द बैठकीत मांडले विचार

याप्रकरणी पोलिसांनी संध्याकाळी ७ वाजण्याच्या सुमारास या मुलांच्या आई-वडिलांचा फोन आला. ज्या भागात ही घटना घडली तिथं या चिमुकल्यांचे वडील बलबीर हे वॉचमन आणि केअर टेकर म्हणून काम करतात. तसेच आपल्या पत्नीसह पाच मुलांसह जवळच राहतात.

Crime
Sharad Pawar: एकजुटीसाठी प्रयत्न करणाऱ्या विरोधी पक्षांना शरद पवारांचा इशारा; म्हणाले...

पोलीस उपाधिक्षक राजेश देव म्हणाले, स्थानिकांच्या माहितीनुसार ही मुलं दुपारी ३ वाजण्याच्या सुमारास खेळताना दिसली होती. ही सर्व मुलं सोसायटीच्या बाहेर खेळत होती पण यांच्यापैकी दोन जण बेपत्ता झाले होते. त्यानंतर त्यांच्या पालकांनी दुपारी ३.३० ते ४ वाजताच्या दरम्यान आपल्या इतर मुलांसह त्यांचा शोध घेण्याचा प्रयत्न केला. काही वेळानं त्यांनी गोडाऊनमधला लाकडी बॉक्स तपासण्यासाठी उघडला तर त्यात या दोन चिमुकल्यांचा मृतदेह संध्याकाळी ७ वाजताच्या दरम्यान आढळून आला. (Marathi Tajya Batmya)

Crime
Jitendra Awhad: मन सुन्न झालंय...! राज्यात आणखी एक दलित हत्याकांड; आव्हाडांच्या ट्विटनं वेधलं लक्ष

दरम्यान, मृत्यू झालेल्या या मुलांच्या शरिरावर कुठल्या प्रकारच्या जखमा आढळून आलेल्या नाहीत. त्यामुळं या बॉक्समध्ये अडकून पडल्यानं श्वास गुदमरुन त्यांचा मृत्यू झाला असावा असा प्राथमिक अंदाज पोलिसांनी वर्तवला आहे. पण डॉक्टरांचं यावर काय म्हणणं आहे हे आम्ही तपासून पाहत असून याप्रकरणी अज्ञातांवर गुन्हाही दाखल करण्याची प्रक्रिया सुरु करण्यात आली असून या मुलांच्या पालकांकडेही काही प्राथमिक चौकशी करण्यात येत असल्याचं त्यांनी सांगितलं.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com