दिल्लीचे उपमुख्यमंत्री मनीष सिसोदिया यांच्या कार्यालयात चोरी

वृत्तसंस्था
शुक्रवार, 30 डिसेंबर 2016

नवी दिल्ली : दिल्लीचे उपमुख्यमंत्री मनीष सिसोदियांच्या विनोदनगर येथील कार्यालयात चोरी झाली. गुरूवारी रात्रीच्या सुमारास झालेल्या या चोरीमध्ये कार्यालयातील लॅपटॉप, संगणक या वस्तूंचा समावेश आहे. चोरट्यांनी कुलूप तोडून कार्यालयातील लेटरहेड व इतर साहित्याची चोरी केली आहे. या कार्यालयाला सात खोल्या असून चोरी झालेल्या संगणक आणि लॅपटॉपमध्ये सरकारशी संबंधित महत्वाची माहिती असल्याचे सूत्रांनी सांगितले. 

सीसीटीव्हीची डीव्हीआरही चोरट्यांनी लंपास केली असण्याची शक्‍यता वर्तवण्यात येत आहे. ही चोरी राजकीय कटाचा भाग असल्याची चर्चा आहे. कार्यालयात चोरी करणे म्हणजे महत्वाची माहिती मिळवण्याचा हेतू असू शकतो,''असे एका वरिष्ठ पोलिस आधिकाऱ्यांनी सांगितले. यापूर्वी सिसोदिया यांच्या सहाय्यकाच्या घरातूनही महत्वाची कागदपत्रे चोरीला गेली होती. या प्रकरणाचा पोलिसांकडून तपास सुरू आहे. 

विनोदनगरमधील हे कार्यालय राष्ट्रीय महामार्गापासून जवळ आहे. या चोरीमुळे उपमुख्यमंत्र्यांचे कार्यालयच असुरक्षित असेल तिथे दिल्लीतील सामान्य जनतेची काय कथा?  

Web Title: Delhi deputy CM Manish Sisodia's office burgled: Documents, computers allegedly stolen