सिसोदियांची प्रकृती खालावली; उपचारासाठी रुग्णालयात दाखल 

वृत्तसंस्था
सोमवार, 18 जून 2018

नायब राज्यपालांच्या कार्यालयात धरणे आंदोलन करत असताना, मनिष सिसोदिया यांची प्रकृती खालावली आहे. त्यांना रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. गेल्या सात दिवसारपासून सिसोदिया हे धरणे आंदोलन करत आहेत. मनिष सिसोदिया यांची प्रकृती खालावल्याने त्यांना एलएनजेपी रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. मनिष सिसोदिया यांच्या आमरण उपोषणाचा आज(सोमवार) सहावा दिवस आहे. त्यांनी रुग्णवाहिकेने एलएनजेपी रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे.

नवी दिल्ली - नायब राज्यपालांच्या कार्यालयात धरणे आंदोलन करत असताना, मनिष सिसोदिया यांची प्रकृती खालावली आहे. त्यांना रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. गेल्या सात दिवसारपासून सिसोदिया हे धरणे आंदोलन करत आहेत. मनिष सिसोदिया यांची प्रकृती खालावल्याने त्यांना एलएनजेपी रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. मनिष सिसोदिया यांच्या आमरण उपोषणाचा आज(सोमवार) सहावा दिवस आहे. त्यांनी रुग्णवाहिकेने एलएनजेपी रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे.

दरम्यान, दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांच्यासह तीन मंत्री हे दिल्लीच्या नायब राज्यपालांच्या निवासस्थानी धरणे आंदोलन करत होते. केजरीवालांसह उपमुख्यमंत्री मनिष सिसोदिया, गृहमंत्री सत्येंद्र जैन, कामगार मंत्री गोपाळ राय हे ही राजनिवासात धरणे करत होते. परंतु, गृहमंत्री सत्येंद्र जैन यांची प्रकृती खालावल्याने त्यांना काल उशिरा रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. त्याच दरम्यान आता मनिष सिसोदिया यांचीही प्रकृती खालावल्याने रुग्णालयात दाखल करण्यात आहे.
 

Web Title: Delhi Dy CM Manish Sisodia hospitalised on sixth day of fast