दिल्लीच्या निकालानंतर, रोहित पवारांनी दिला काँग्रेसला महत्त्वाचा सल्ला

टीम ई सकाळ
मंगळवार, 11 फेब्रुवारी 2020

भावनिकतेपेक्षा विकासाचं राजकारण महत्त्वाचं असून, दिल्ली विधानसभा निवडणुकीत सत्याचा विजय झाला, अशी प्रतिक्रिया राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते आणि आमदार रोहित पवार यांनी इलेक्ट्रॉनिक मीडियाशी बोलताना दिली. त्याचवेळी त्यांनी खातंही उघडू न शकलेल्या काँग्रेसला मोलाचा सल्लाही दिला आहे. 

नवी दिल्ली : भावनिकतेपेक्षा विकासाचं राजकारण महत्त्वाचं असून, दिल्ली विधानसभा निवडणुकीत सत्याचा विजय झाला, अशी प्रतिक्रिया राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते आणि आमदार रोहित पवार यांनी इलेक्ट्रॉनिक मीडियाशी बोलताना दिली. त्याचवेळी त्यांनी खातंही उघडू न शकलेल्या काँग्रेसला मोलाचा सल्लाही दिला आहे. 

ताज्या बातम्यांसाठी डाऊनलोड करा ई-सकाळचे ऍप

काय म्हणाले रोहित पवार 
रोहित पवार म्हणाले, 'दिल्लीत आम आदमी पक्षाच्या सरकारने चांगली कामं केली होती. दिल्लीत शिक्षण, आरोग्य, वीज या विषयांवर काम चांगलं झालं, त्याची दखल घ्यायलाच हवी. या निवडणुकीत जनतेनं याच विकासाच्या मुद्द्यांना प्राधान्य दिलं आणि भावनिकतेचं राजकारणा बाजूला केलं. सत्याचा विजय झाला आणि अहंकाराचा पराभव झाला. लोकांनी भाजपच्या विरोधात कौल दिला आहे. कारण, प्रचारासाठी 12 मुख्यमंत्री जाऊनही भाजपचा पराभव झाला आहे. आता प्रादेशिक पक्षांनी एकत्र काम करण्याची गरज आहे.'

Delhi Elections : 'आप'ला धक्का, उपमुख्यमंत्री मनिष सिसोदिया पिछाडीवर

काँग्रेसमध्ये संघटनात्मक कामाची गरज 
अहंकारी लोकांना दिल्लीकरांनी नाकारल्याचं मत व्यक्त करून रोहित पवार म्हणाले, 'एकेकाळी संपूर्ण देशभरात भाजपचं राज्य आणि विचार दिसत होता. पण, जसं डी फॉरेस्टिंग होतं, तसच भाजपचं आणि त्यांच्या विचाराचं डी फॉरेस्टिंग होईल.' आपच्या विजयबरोबरच भाजपचा आणि काँग्रेसचा पराभव झाला आहे. काँग्रेसमध्ये संघटनात्मक कामाची गरज असल्याचं मतही रोहित पवार यांनी व्यक्त केलं.


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: delhi election 2020 results ncp leader rohit pawar advice for congress