शीला दीक्षित यांच्या निधनानंतर दिल्लीत दोन दिवसांचा दुखवटा जाहीर

शीला दीक्षित यांच्या निधनानंतर दिल्लीत दोन दिवसांचा दुखवटा जाहीर

नवी दिल्ली : दिल्लीच्या माजी मुख्यमंत्री व दिल्ली काँग्रेस अध्यक्षा शीला दीक्षित (वय 81) यांचे आज (शनिवार) दुपारी दीर्घ आजाराने निधन झाले. त्यांच्या निधनानंतर दिल्लीत दोन दिवसांचा राजकीय दुखवटा जाहीर करण्यात आला. याबाबतची माहिती दिल्लीचे उपमुख्यमंत्री मनीष सिसोदिया यांनी दिली. 

दिल्ली सरकारने 2 दिवसांचा राजकीय दुखवटा जाहीर केला आहे. त्यांच्या निधनाची वृत्त समजल्यानंतर अत्यंत दु:ख होत आहे. त्यांच्या निधनानंतर राज्यात राजकीय दुखवटा जाहीर करण्यात येत आहे, असे सिसोदिया यांनी सांगितले. 

शीला दीक्षित गेल्या अनेक दिवसांपासून त्या आजारी होत्या. आज दुपारी दिल्लीतील एस्कॉर्ट रुग्णालयात उपचारादरम्यान त्यांची प्राणज्योत मालविली. त्यांच्या निधनाच्या वृत्तानंतर देशभरातून शोक व्यक्त करण्यात येत आहे. 

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com