दिल्लीतील 18 पान मसाले आरोग्यासाठी धोकादायक!

वृत्तसंस्था
शुक्रवार, 6 जानेवारी 2017

नवी दिल्ली : दिल्ली सरकारकडून राबविण्यात येत असलेल्या तंबाखूविरोधी मोहिमे अंतर्गत पान मसाल्यांची तपासणी करण्यात आली. त्यामध्ये तंबाखूमिश्रित 62 पान मसाल्यांपैकी पाच नमुन्याने पान मसाले हे आरोग्यासाठी हानीकारक असल्याचे आढळून आले असून 18 नमुने हे ब्रॅण्डचा गैरवापर करून खपवित असल्याचे अन्नतज्ज्ञांना आढळून आले आहे.

दिल्ली सरकारने यासंदर्भातील अहवाल केंद्राच्या आरोग्य मंत्रालयाकडे पाठविला आहे. याबाबत बोलताना दिल्लीचे मुख्य सचिव म्हणाले की, "कायद्यातील तरतुदीप्रमाणे या प्रकरणातील दोषींवर योग्य ती कारवाई केली जाईल.' अलिकडेच तंबाखूवर बंदीची अंमलबजावणी करण्यात दिल्ली सरकार अपयशी ठरल्याची टीका केंद्राच्या आरोग्य मंत्रालयाने केली होती. तसेच दिल्ली सरकारला याबाबतचा अहवाल सादर करण्याचे निर्देश दिले होते. याबाबत बोलतान केंद्रीय आरोग्य मंत्री फगान सिंह कुलस्ते म्हणाले, "गुजरात आणि महाराष्ट्रामध्ये तंबाखूच्या विक्रीवर बंदी आणली आहे. दिल्लीमध्ये अनेकदा ही बंदी अनेकदा आणली आहे, मात्र ती केवळ कागदोपत्री बंदीच ठरली आहे.'

तंबाखूजन्य पदार्थांवर बंदी आणण्याचे आदेश सर्वोच्च न्यायालयाने 23 सप्टेंबर 2016 रोजी दिले होते. त्यानंतर डिसेंबर 2016 मध्ये तंबाखूवरील नियंत्रणाबाबत अंमलात आणलेल्या उपाययोजनेबाबत अहवाल सादर करण्याचे निर्देश केंद्राने सर्व राज्यांना दिले होते. केंद्राकडे असा आदेश सादर करणारे दिल्ली हे देशातील पहिले राज्य ठरले आहे.

Web Title: Delhi Government ups ante on tobacco control