जेटलींनी दाखल केलेल्या अब्रुनुकसान खटल्यात केजरीवाल निर्दोष

वृत्तसंस्था
मंगळवार, 3 एप्रिल 2018

केजरीवाल यांनी दिल्ली आणि जिल्हा क्रिकेट असोसिएशनमध्ये 13 वर्षांच्या कार्यकाळात झालेल्या भ्रष्टाचाराच्या प्रकरणातून अरुण जेटलींवर गंभीर आरोप केले होते. त्यामुळे जेटलींनी केजरीवाल यांच्याविरोधात अब्रुनुकसानीचा दावा दाखल केला होता.

नवी दिल्ली : दिल्ली उच्च न्यायालयाने आम आदमी पक्षाचे संयोजक आणि दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांची अब्रुनुकसान प्रकरणातून आज (मंगळवार) निर्दोष मुक्तता केली. केंद्रीय अर्थमंत्री अरुण जेटली यांनी याबाबत खटला दाखल केला. या खटल्याच्या सुनावणीदरम्यान न्यायालयाने केजरीवाल यांना निर्दोष मुक्त केले. 

Delhi High Courts

केजरीवाल यांनी दिल्ली आणि जिल्हा क्रिकेट असोसिएशनमध्ये 13 वर्षांच्या कार्यकाळात झालेल्या भ्रष्टाचाराच्या प्रकरणातून अरुण जेटलींवर गंभीर आरोप केले होते. त्यामुळे जेटलींनी केजरीवाल यांच्याविरोधात अब्रुनुकसानीचा दावा दाखल केला होता. मात्र, केजरीवाल यांनी अरुण जेटली आणि त्यांच्या कुटुंबीयांची जाहीर माफी मागितली. त्यामुळे या प्रकरणावर पदडा पडला असून, केजरीवाल निर्दोष झाले आहेत.   

दरम्यान, आम आदमी पक्षाचे संजय सिंग, आशुतोश, दिपक वाजपेयी आणि राघव छढा या चार नेत्यांनीही अरुण जेटली यांची माफी मागितली. 

Web Title: Delhi HC acquits Kejriwal in defamation case Arun Jaitley