'केजरीवालांना कोणी दिली आंदोलन करण्याची परवानगी'

वृत्तसंस्था
सोमवार, 18 जून 2018

दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांच्यासह तीन मंत्री हे दिल्लीच्या नायब राज्यपालांच्या निवासस्थानी धरणे आंदोलन करत आहेत. केजरीवालांसह उपमुख्यमंत्री मनिष सिसोदिया, गृहमंत्री सत्येंद्र जैन, कामगार मंत्री गोपाळ राय हे ही राजनिवासात धरणे करत आहेत. परंतु, हे धरणे धरण्याची परवानगी केजरीवालांना कोणी दिली? असा प्रश्न न्यायालयाने अरविंद केजरीवालांना केला आहे.

नवी दिल्ली - दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांच्यासह तीन मंत्री हे दिल्लीच्या नायब राज्यपालांच्या निवासस्थानी धरणे आंदोलन करत आहेत. केजरीवालांसह उपमुख्यमंत्री मनिष सिसोदिया, गृहमंत्री सत्येंद्र जैन, कामगार मंत्री गोपाळ राय हे ही राजनिवासात धरणे करत आहेत. परंतु, हे धरणे धरण्याची परवानगी केजरीवालांना कोणी दिली? असा प्रश्न न्यायालयाने अरविंद केजरीवालांना केला आहे.

नायब राज्यपालांच्या कार्यालयामध्ये धरणे करण्यासाठी त्यांनी नायब राज्यपालांची परवानगी घेतली आहे का? असा प्रश्नही न्यायालयाने केला आहे. त्याचबरोबर, दिल्लीचे भारतीय जनता पक्षाचे नेते विजेंद्र गुप्ता यांनी न्यायालयात याचिका दाखल करुन केजरीवाल यांना न्यायालयाने धरणे सोडण्यासाठी आदेश द्यावेत असे म्हटले आहे. 

दरम्यान, दिल्लीतील समस्या दूर व्हाव्यात, चार महिन्यांपासून सुरू असलेला प्रशासकीय अधिकाऱ्यांचा संप मागे घेतला जावा, कामबंद आंदोलन करणाऱ्या अधिकाऱ्यांविरोधात कठोर कारवाई व्हावी, घरपोच रेशन योजनेला नायब राज्यपालांनी मान्यता द्यावी, अशा मागण्या या अंदोलनाच्या माध्यमातून अरविंद केजरीवाल यांनी केल्या आहेत.

Web Title: delhi-hc-asks-who-authorised delhi chief minister arvind kejriwal sit in at lieutenant governor office