आयएनएक्स मीडिया ; पी. चिदंबरम यांना तूर्त अटक नाही

Delhi HC grants former Union minister P Chidambaram interim protection from arrest till 1 August
Delhi HC grants former Union minister P Chidambaram interim protection from arrest till 1 August

नवी दिल्ली : आयएनएक्स मीडिया आर्थिक गैरव्यवहारप्रकरणी माजी केंद्रीय मंत्री आणि काँग्रेसचे ज्येष्ठ नेते पी. चिदंबरम यांना दिल्ली उच्च न्यायालयाने त्यांच्या अटकेपासून 1 ऑगस्टपर्यंत दिलासा दिला आहे. आर्थिक गैरव्यवहारप्रकरणी सक्तवसुली संचालनालयामार्फत (ईडी) तपास करण्यात येत आहे.

दिल्ली उच्च न्यायालयाचे न्यायाधीश के. पाठक यांनी चिदंबरम यांना दिलासा दिला आहे. मात्र, सक्तवसुली संचालनालयाला तपासात सहकार्य करावे आणि न्यायालयाच्या पूर्वपरवानगीशिवाय देशाबाहेर जाता येणार नाही, असे न्यायालयाने सांगितले आहे. एक ऑगस्टपर्यंत कोणतीही कारवाई केली जाऊ नये. याप्रकरणी ईडी आणि केंद्रीय अन्वेषण विभागनेही (सीबीआय) याबाबत याचिका दाखल केली होती. यावरही न्यायालयाने बाजू ऐकून घेतली.  

दरम्यान, यापूर्वी पी. चिदंबरम यांना अटक करु नये, असा निकाल न्यायालयाने दिला होता. त्यानंतर आता दिल्ली उच्च न्यायालयाने पी. चिदंबरम यांना पुन्हा एकदा दिलासा दिला आहे. 

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Esakal Marathi News
www.esakal.com