'आयएनएक्स' मीडिया गैरव्यवहार ; कार्ती चिदंबरम यांना जामीन

वृत्तसंस्था
शुक्रवार, 23 मार्च 2018

कार्ती चिदंबरम यांच्या जामीन अर्जावर आज (शुक्रवार) दिल्ली उच्च न्यायालयात सुनावणी घेण्यात आली. या सुनावणीदरम्यान न्यायालयाने कार्ती चिदंबरम यांना 10 लाखांच्या जातमुचक्यावर जामीन मंजूर केला आहे. 

नवी दिल्ली : आयएनएक्स मीडिया गैरव्यवहारप्रकरणी कार्ती चिदंबरम यांना दिल्ली उच्च न्यायालयाने आज (शुक्रवार) जामीन मंजूर केला. न्यायालयाने कार्ती चिदंबरम यांना 10 लाखांच्या जातमुचलक्यावर जामीन मंजूर केला. तसेच यादरम्यान त्यांना देशाबाहेर प्रवास करण्यास बंदी घालण्यात आली आहे.

INX fraud

आयएनएक्स मीडिया गैरव्यवहारप्रकरणी कार्ती चिदंबरम यांना अटक करण्यात आली होती. जामीन मिळावा यासाठी अनेकदा त्यांनी जामीन अर्ज दाखल केला होता. त्यानंतर 15 मार्चला सर्वोच्च न्यायालयाने अंतरिम संरक्षण देत 26 मार्चपर्यंत त्यांना सक्तवसुली संचलनायाकडून कोणतीही अटक करण्यात येऊ यासाठी अंतरिम संरक्षण देण्यात आले होते. त्यांच्या जामीन अर्जावर आज (शुक्रवार) दिल्ली उच्च न्यायालयात सुनावणी घेण्यात आली. या सुनावणीदरम्यान न्यायालयाने कार्ती चिदंबरम यांना 10 लाखांच्या जातमुचक्यावर जामीन मंजूर केला आहे. 

दरम्यान, मे 2017 मध्ये सक्तवसुली संचलनायाकडून आर्थिक गैरव्यवहारप्रकरणी कार्ती चिदंबरम यांच्याविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला. त्यानंतर आज त्यांना जामीन मंजूर करण्यात आला आहे.

Web Title: Delhi HC Today grants bail to Karti Chidambaram in INX Media case