Yasin Malik : फुटीरतावादी नेता यासिन मलिकच्या फाशीबद्दल मोठी अपडेट, दिल्ली कोर्टाने घेतला 'हा' निर्णय

yasin malik
yasin malikesakal

नवी दिल्लीः टेरर फंडिंग प्रकरणात दिल्ली हायकोर्टाने जेकेएलएफ नेता यासिन मलिक याला नोटीस बजावली आहे. एनआयएने यासिन मलिकच्या फाशीची मागणी कोर्टाकडे केली होती. त्या प्रकरणाची सुनावणी सुरु आहे.

जम्मू-काश्मीरचा फुटिरतावादी नेता यासिन मलिक याला फाशीची शिक्षा सुनावण्यात यावी, यासाठी NIAनं दिल्ली हायकोर्टात धाव घेतली आहे. भारतीय जवानांवर गोळीबार, गृहमंत्र्यांच्या मुलीचं अपहरण करण्याबरोबरच टेरर फंडिंगचेही त्याच्यावर आरोप आहेत.

गेल्यावर्षी ट्रायल कोर्टानं त्याला जन्मठेपेची शिक्षा सुनावली होती. त्याला फाशी देण्यात यावी अशी मागणी एनआयएने ट्रायल कोर्टासमोर केली होती, पण ती फेटाळण्यात आली. आता एनआयएनं दिल्ली हायकोर्टात धाव घेतली आहे. हायकोर्टाचे न्या. सिद्धार्थ मृदुल आणि न्या. तलवंत सिंग यांच्या खंडपीठासमोर सोमवारी एनआयएच्या याचिकेवर सुनावणी झाली.

दिल्ली उच्च न्यायालयाने जेकेएलएफ नेते यासिन मलिक याला राष्ट्रीय तपास संस्थेच्या (एनआयए) अपीलवर नोटीस बजावली असून दहशतवाद निधी प्रकरणी त्याला फाशीची शिक्षा द्यावी, अशी मागणी आहे.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com