Delhi High Court Decision : हायकोर्टाचा स्पाईस जेटला 380 कोटींचा दणका; नेमकं प्रकरण काय? | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

Spice jet latest marathi news

Delhi High Court Decision : हायकोर्टाचा स्पाईस जेटला 380 कोटींचा दणका; नेमकं प्रकरण काय?

नवी दिल्लीः दिल्ली हायकोर्टाने स्पाईस जेट कंपनीला ३८० कोटी रुपयांचा व्याजाचा परतावा देण्याचे आदेश दिले आहे. स्पाईस जेटचे माजी प्रवर्तक सन ग्रुपचे कलानिधी मारन यांना परतावा देण्याचे आदेश दिले.

चार आठवड्यांच्या आत स्पाईस जेटला मालमत्तेचे प्रतिज्ञापत्र सादर करण्याचे आदेश देण्यात आलेले आहेत. ही रक्कम कमी होती. परंतु व्याज वाढत गेले. आता स्पाईस जेटला ३८० कोटी रुपये भरावे लागतील.

२९ मे २०२३ रोजी हायकोर्टाने निकाल दिला. मारन कुटुंब आणि विद्यमान प्रवर्तक अजय सिंग आणि स्पाईसजेट यांच्यातील हा दायित्ववाद आहे. डिसेंबर तिमाहीमध्ये स्पाईस जेटचं उत्पन्न चार पटीने वाढ होऊन १०६.८ कोटी रुपयांवर गेलं आहे. कोर्टाने दिलेला निकाल हा कंपनीसाठी धक्कादायक आहे.

मारन यांनी २०१७मध्ये स्पाईस जेटवर दावा दाखल केला होता. त्यामध्ये त्यांनी केएएल एअरवेजला कन्वर्टिबल वॉरंट आणि प्रेफरन्स शेअर जारी करण्यात अपयशी ठरल्याबद्दल नुकसान झाल्याचं नमूद केलं होतं. आता मोठा लढा दिल्यानंतर स्पाईस जेटने मारण यांना ५९७.०८ कोटी रुपयांच्या मूळ रकमेचा परतावा केला.

परताव्यानंर व्याज बाकी होतं. ऑक्टोबर २०२० मध्ये व्याजाची रक्कम २४२ कोटी रुपये होती, फेब्रुवारीमध्ये ३६२ कोटी आणि आता ३८० कोटी रुपये व्याज कंपनीला देणं आहे. स्पाईस जेटच्या एका प्रवक्त्याने सांगितलं की, स्पाईस जेट मारन आणि काल एअरवेज यांच्याशी बातचित करीत आहे.

टॅग्स :high court