ऑनलाईन औषधविक्रीवर नियम लागू होईपर्यंत बंदीच : दिल्ली उच्च न्यायालय

पीटीआय
बुधवार, 19 डिसेंबर 2018

नवी दिल्ली : ऑनलाईन औषध विक्रीबाबत ठोस नियम लागू होत नाहीत. तोपर्यंत त्यावर घालण्यात आलेली बंदी कायम राहील, असे आज दिल्ली उच्च न्यायालयाने स्पष्ट करीत ई-फार्मसी कंपन्यांना दिलासा देण्यास नकार दिला. 

नवी दिल्ली : ऑनलाईन औषध विक्रीबाबत ठोस नियम लागू होत नाहीत. तोपर्यंत त्यावर घालण्यात आलेली बंदी कायम राहील, असे आज दिल्ली उच्च न्यायालयाने स्पष्ट करीत ई-फार्मसी कंपन्यांना दिलासा देण्यास नकार दिला. 

एका याचिकेवर सुनावणी करताना दिल्ली उच्च न्यायालयाने शुक्रवारी (ता. 13) ऑनलाईन औषध विक्रीवर देशभरात बंदी घालण्याचा निर्णय दिला होता. आता काही ई-फार्मसी कंपन्यांनी ही बंदी मागे घ्यावी, अशी मागणी करत याविरोधात याचिका दाखल केली असून, त्यावर आज मुख्य न्यायाधीश राजेंद्र मेनन व न्यायाधीश व्ही. के. राव यांच्या पीठासमोर सुनावणी झाली. 
ऑनलाईन औषधविक्रीवर नियंत्रण ठेवण्यासाठी सध्या कोणतेही नियम अस्तित्वात नाहीत. ही खरी समस्या असून, हे नियम अमलात आल्यानंतर कंपन्या पूर्वीप्रमाणे औषध विक्री करू शकतात. मात्र, तोपर्यंत त्यावरील बंदी कायम राहील, असे न्यायालयाने सुनावणीत स्पष्ट केले. 

ई-फार्मसी कंपन्यांचा दावा 

आमच्याकडे औषधविक्रीचा परवाना असून, कोणत्याही औषधांची बेकायदा विक्री होत नसल्याचा दावा ई-फार्मसी कंपन्यांनी केला आहे. इतकेच नव्हे, तर डॉक्‍टरांनी दिलेले प्रिस्क्रिब्शन वैध आहे का, याची पडताळणी करूनच संबंधितांना औषधांची विक्री केली जात असल्याचे या कंपन्यांनी म्हटले आहे.

Web Title: Delhi High Courts Decision on Online Drug Sale