दिल्लीत अर्पित पॅलेस हॉटेलला आग; नऊ जणांचा मृत्यू

Delhi hotel fire Nine dead in blaze at Hotel Arpit Palace in Karol Bagh
Delhi hotel fire Nine dead in blaze at Hotel Arpit Palace in Karol Bagh

नवी दिल्लीः मध्य दिल्लीमध्ये असलेल्या करोलबाग येथील अर्पित पॅलेस हॉटेलमध्ये आज (मंगळवार) पहाटे चारच्या सुमारास भीषण आग लागली होती. या आगीमध्ये नऊ जणांचा मृत्यू झाला आहे. चार तासाच्या प्रयत्नानंतर या आगीवर नियंत्रण मिळवण्यात यश आले आहे.

हॉटेलमध्ये आज पहाटे चारच्या सुमारास सर्वजण झोपेत असताना ही घटना घडली. मृतांमध्ये सात पुरुष, एक लहान मुलगा व एका महिलेचा समावेश आहे. दोघे जण गंभीर जखमी असून, उपचारासाठी त्यांना रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. आगीची माहिती मिळताच अग्निशमन दलाच्या 26 गाडया व पोलिस घटनास्थळी दाखल झाले. चार तासानंतर आग आटोक्यात आली. हॉटेलमधून 35 जणांना सुरक्षितरित्या बाहेर काढण्यात आले आहे.

हॉटेलमध्ये गाढ झोपेत असलेल्या नागरिकांना आग लागल्याची माहिती समजल्यानंतर अनेकांनी घाबरून इमारतीवरून उड्या मारल्याने काही जण जखमी झाले आहेत. हॉटेलमध्ये मोठा गोंधळ उडाला होता. परंतु, तात्काळ उपाय म्हणून हॉटेलच्या काचा फोडण्यात आल्याने धुर बाहेर जाऊ शकला. मृत्यूमुखी पडलेल्या नऊ जणांपैकी कांहीचा धुरामुळे गुदमुरून मृत्यू झाला आहे, अशी माहिती अग्निशामक दलाच्या अधिकाऱयाने दिली.

दरम्यान, अर्पित पॅलेस पाचमजली हॉटेल आहे. आग कशामुळे लागली ते अद्याप स्पष्ट झालेले नाही. शॉर्ट सर्किटमुळे ही आग लागल्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे. पोलिसांनी गुन्हा दाखल करून घेतला असून, पुढील चौकशी करत आहेत.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com