Duty First : कॅन्सर असतानाही जिगरबाज आयपीएस ऑफिसरनं केले कोरोनाशी दोन हात!

वृत्तसंस्था
रविवार, 26 एप्रिल 2020

दोन दिवसांपूर्वी त्यांच्यावर शस्त्रक्रिया करण्यात आली असून आता त्यांची तब्येत ठीक आहे. तेथे त्यांची काळजी घेण्यासाठी त्यांचे जवळचे मित्र आहेत.

नवी दिल्ली : कोरोना व्हायरला हरविण्यासाठी अनेक डॉक्टर्स आणि पोलिस आपल्या जीवाचं रान करत आहेत. कोरोनाची लागण झालेल्यांवर डॉक्टर उपचार करत आहेत. तर दुसरीकडे लॉकडाऊनमुळे देशभरातील नागरिकांना कोणत्याही प्रकारचा त्रास होऊ नये, तसेच त्यांच्या सुरक्षेसाठी पोलिस रात्रंदिवस आपली सेवा बजावत आहेत. याच पार्श्वभूमीवर दिल्लीतील एका आयपीएस अधिकाऱ्याची चर्चा सध्या सगळीकडे होत आहे. 

ताज्या बातम्यांसाठी डाऊनलोड करा ई-सकाळचे ऍप

कॅन्सरकडे दुर्लक्ष करत बजावले कर्तव्य
२००९ च्या बॅचचे आयपीएस अधिकारी असलेल्या आनंद मिश्रा यांची सध्या सर्वत्र जोरदार चर्चा सुरू आहे. आनंद मिश्रा हे बाह्य दिल्लीचे अतिरिक्त पोलिस उपायुक्त म्हणून सध्या कार्यरत आहेत. कामगारांनी गजबजलेल्या भागात त्यांची पोस्टिंग झाली होती. त्यामुळे ते सकाळपासून रात्रीपर्यंत कामात व्यस्त राहत. मार्चमध्ये त्यांना घशाचा त्रास जाणवू लागला. आणि तो वाढत गेला. त्यानंतर त्यांनी डॉक्टरांचा सल्ला घेतला. २८ मार्चला टेस्ट केल्यानंतर त्यांना थायरॉइड कॅन्सर असल्याचे डॉक्टरांनी सांगितले. त्यानंतर २४ एप्रिलला राजीव गांधी कॅन्सर इन्स्टिट्यूटमध्ये त्यांच्यावर शस्त्रक्रियाही झाली. सध्या त्यांची प्रकृती स्थिर असल्याची माहिती डॉक्टरांनी दिली. 

Image may contain: 1 person, indoor

कॅन्सरसारख्या गंभीर आजाराने ग्रासल्यानंतरही त्यांनी आपले काम थांबवले नाही. कॅन्सरमुळे होणारा त्रास सहन करत ते ड्युटी बजावत राहिले. त्यांना कॅन्सर झाला आहे, ही गोष्ट त्यांनी कुटुंबीयांपासूनही लपवून ठेवली. आनंद यांची पत्नी आणि मोठे बंधू या दोघांनाच फक्त याबाबतची कल्पना दिली होती. 

आणखी वाचा - पुण्यात कोथरूडकरांनी रोखला कोरोना राक्षस

घरच्यांपासून लपविली माहिती

कॅन्सर असल्याची माहिती त्यांनी सर्वात अगोदर मला दिली होती. मात्र, घरातील कुणालाही याबाबत सांगण्यास त्यांनी विरोध केला होता. कोरोना व्हायरसचा फैलाव वाढत असल्यामुळे सुट्टी मिळण्याची कोणतीही शक्यता नव्हती. दिल्लीतील परिस्थिती नाजूक असून हॉस्पिटलमध्ये गेल्यावर कोरोनाची लागण होण्याची शक्यता नाकारता येत नव्हती. त्यामुळे आनंद यांनी घरी येण्यासही नकार दर्शविला होता.

त्यांच्यासोबत राहण्याची माझी खूप इच्छा आहे. मात्र, आनंद यांनी मलाही येण्यास मनाई केली आहे. आणि ऑफिसच्या कामांमुळे मीदेखील इथून जाऊ शकत नाही. आता त्यांच्या प्रकृतीमध्ये सुधारणा होत आहे, अशी माहिती आनंद मिश्रा यांच्या पत्नी आलोक दुबे-मिश्रा यांनी दिली. त्या मथुरा शहराच्या मुख्याधिकारी म्हणून कार्यरत आहेत. 

- लॉकडाऊन वाढणार? इतर राज्यात अडकलेल्या नागरिकांना आणण्यासाठी राज्य सरकारच्या हालचाली

आनंद हे सुरवातीपासूनच कर्तव्य आणि सिद्धांतानुसार जीवन जगणारे व्यक्ती म्हणून त्यांच्या परिचितांमध्ये ओळखले जातात. आम्हा भावंडांमध्ये मोठे असूनही त्यांनी आम्हाला जीवलग मित्रांसारखीच वागणूक दिली. लहानपणापासूनच त्यांना देशाविषयी प्रचंड आदर आणि प्रेम आहे. त्यामुळेच त्यांनी पोलिस ड्युटी जॉईन केली. 

Image may contain: 1 person

गेल्या काही दिवसांपासून त्यांना त्रास होत होता. याबाबत त्यांनी मला आणि त्यांच्या पत्नीला याबाबतची माहिती दिली होती. जेव्हा आनंदचे ऑपरेशन करण्यात आले, तेव्हा त्यांना कॅन्सर असल्याचे घरच्यांना माहिती झाले. मात्र, पुसटशी कल्पनाही आनंदने घरच्यांना होऊ दिली नाही. कॅन्सरसारखा गंभीर आजार झाल्यानंतर कधीही त्यांच्या चेहऱ्यावर मला तणाव दिसून आला नाही.

- Coronavirus : तुमच्यासोबत कुठल्याही प्रकारची लपवाछपवी करत नाही : मुख्यमंत्री

दोन दिवसांपूर्वी त्यांच्यावर शस्त्रक्रिया करण्यात आली असून आता त्यांची तब्येत ठीक आहे. तेथे त्यांची काळजी घेण्यासाठी त्यांचे जवळचे मित्र आहेत. घरच्यांना दिल्लीत येण्यास त्यांनी मनाई केली आहे. ऑपरेशन झाल्यानंतर आई-वडिल काळजीत पडले होते. मात्र, त्यांनाही लॉकडाऊननंतर येण्यास आनंदने बजावले आहे, अशी माहिती आनंद यांचे छोटे बंधू अभिषेक मिश्रा यांनी दिली.

- पुण्याच्या बातम्या वाचण्यासाठी येथे ► क्लिक करा 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Delhi IPS officer Anand Mishra puts corona fight before cancer care