दिल्ली गारठली; 118 वर्षांत पहिल्यांदाच असं घडलं!

सकाळ न्यूज नेटवर्क 
Saturday, 28 December 2019

नवी दिल्ली : राष्ट्रीय राजधानी दिल्लीस संपूर्ण उत्तर भारताला थंडीच्या लाटेचा तडाखा बसला असून, दिल्लीत आज पारा चक्क 1.7 अंशांपत खाली गेला. गेल्या 118 वर्षांतील हे आतापर्यंतचे सर्वांत नीचांकी तापमान ठरले. या कडाक्‍याच्या थंडीने दिल्लीकरांना चांगलीच हुडहुडी भरली आहे.

ताज्या बातम्यांसाठी डाऊनलोड करा ई-सकाळचे ऍप

नवी दिल्ली : राष्ट्रीय राजधानी दिल्लीस संपूर्ण उत्तर भारताला थंडीच्या लाटेचा तडाखा बसला असून, दिल्लीत आज पारा चक्क 1.7 अंशांपत खाली गेला. गेल्या 118 वर्षांतील हे आतापर्यंतचे सर्वांत नीचांकी तापमान ठरले. या कडाक्‍याच्या थंडीने दिल्लीकरांना चांगलीच हुडहुडी भरली आहे.

ताज्या बातम्यांसाठी डाऊनलोड करा ई-सकाळचे ऍप

काश्‍मीर, उत्तराखंड, हिमाचल प्रदेशात जोरदार बर्फवृष्टी सुरू असून, या भागांतील तापमान शून्याच्याखाली उणे 20 अंश सेल्शिअसपर्यंत पोचल्याने उत्तर भारतात थंडीची लाट आली आहे. यामुळे काल दिल्लीत 4.2 अंश सेल्शिअस इतक्‍या नीचांकी तापमानाची नोंद झाली होती. त्यानंतर आज तब्बल दोन अंश सेल्सिअसने पारा घसरला आणि आजचे सरासरी किमान तापमान 2.4 अंश सेल्शिअस राहिले. हवामान खात्याच्या लोधी रोड भागातील केंद्रात सकाळी सहा वाजून दहा मिनिटांपर्यंत पारा 1.7 अंशांपर्यंत खाली उतरल्याची नोंद करण्यात आली. याव्यतिरिक्त सफदरंज एन्क्‍लेव्ह भागात साडेआठच्या सुमारास 2.4 अंश सेल्शिअस, पालम भागात 3.1 अंश सेल्शिअस; तसेच आयानगर भागात 1.9 अंश सेल्शिअस अशी नीचांकी तापमानाची नोंद झाली. गारठलेल्या दिल्लीकरांनी सुटीचा दिवस असल्याने घराबाहेर पडणे टाळले. बाहेर पडलेली मंडळी ठिकठिकाणी शेकोटी करून बसलेल्या घोळक्‍यात सहभागी होऊन थंडीपासून बचावाचा प्रयत्न करताना दिसली. 

आणखी वाचा - एसबीआयच्या ग्राहकांनो तुमच्यासाठी आहे खूशखबर!

दाट धुके
दिल्लीत कडाक्‍याच्या थंडीसोबतच पहाटेपासून गडद धुके होते. यामुळे इंदिरा गांधी आंतरराष्ट्रीय विमानतळावरील दृष्यमानतेवरही परिणाम झाल्याने काही उड्डाणे रद्द करण्यात आली. धुक्‍यामुळे दिल्लीत उतरणाऱ्या विमानांना अन्यत्र वळवावे लागले. उत्तर भारतातील थंडीचा फटका रेल्वे वाहतुकीलाही बसला. बऱ्याच गाड्या विलंबाने धावत असल्याचे रेल्वेतर्फे सांगण्यात आले. 

आणखी वाचा - निवड समिती अध्यक्षासंदर्भात गांगुलीची महत्त्वाची घोषणा

तीव्रता आणखी तीन-चार दिवस 
उत्तर भारतात डिसेंबर आणि जानेवारी हे दोन महिने कडाक्‍याच्या थंडीचे असतात. डिसेंबरमधील किमान तापमानाची आतापर्यंतची सरासरी सोळा ते अठरा अंश सेल्शिअस एवढी राहिली आहे. मात्र यंदाची परिस्थिती वेगळी असल्याचे हवामान तज्ज्ञांचे म्हणणे आहे. लडाखच्या द्रास खोऱ्यापासून ते दिल्ली, राजस्थान, पंजाब, उत्तर प्रदेशातील जनजीवन थंडीमुळे अक्षरशः गोठले आहे. थंडीच्या लाटेची तीव्रता आगामी तीन ते चार दिवस कायम राहील, असाही अंदाज तज्ज्ञांनी वर्तविला आहे. 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: delhi lowest temperature in last 118 years with foggy day