माझ्यासोबत पळून चल म्हणाला अन्...

Delhi Man Stabs Married Woman To Death In Front Of Her Son
Delhi Man Stabs Married Woman To Death In Front Of Her Son

नवी दिल्लीः एका 24 वर्षीय विवाहीत महिलेला प्रियकर म्हणाला आपण पळून जाऊ. पण, महिलेने नकार दिल्यानंतर चिडलेल्या प्रियकराने प्रेयसीवर चाकूने सपासप वार केले. या घटनेत महिलेचा जागीच मृत्यू झाला. महिलेचा मृत्यू तिच्या चार वर्षाच्या मुलाच्या डोळ्यासमोर घडल्याने चिमुकला घाबरला आहे.

दक्षिण दिल्लीमधील चिराग भागात ही घटना घडली आहे. मृत्युमखी पडलेल्या महिलेचे नाव पिंकी चौहान (वय 24) तर हल्ला करणाऱयाचे नाव सनी आहे. सनीने पिंकीची हत्या केल्यानंतर त्याने स्वतःवरही वार करून घेतले. यामध्ये तो जखमी झाला असून, उपचारासाठी त्याला रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, पिंकीने कुटुंबियांच्या पसंतीने पाच वर्षांपूर्वी विवाह केला होता. विवाहानंतर कुटुंबाला आर्थिक मदत म्हणून पिंकीने एका ब्युटी पार्लरमध्ये नोकरी सुरु केली. एका व्हॅलेंटाइन्स डे ला पिंकीची दक्षिण दिल्लीमधील देवळी येथे राहणाऱ्या सनी नावाच्या मुलाबरोबर ओळख झाली. पिंकी आणि सनीची पुढे मैत्री वाढत गेली व मैत्रीचे रुपांतर प्रेमात झाले. दोघांच्या प्रेमाबद्दल पिंकीच्या नवऱयाला समजले.  त्यामुळे पिंकीच्या पतीने दुसरीकडे राहायला जाण्याचा निर्णय घेतला. एक महिन्यापूर्वीच ते चिराग भागात राहायला आले होते. पिंकीच्या नवऱयाने घरी राहून कुटुंबाचा सांभाळ करण्यास सांगितले. मात्र, पिंकीवर तिच्या नवऱ्याने लादलेले निर्बंध सनीला मान्य नव्हते. पिंकीचा नवरा घरी नसताना सनी पिंकीला घरी भेटायला येत असे. पण, अनैतिक संबंध ठेऊन आपण चूक केली आहे हे पिंकीला कळले. यामुळे तिने सनीला टाळायला सुरुवात केली. पिंकी बदलली हे पाहून सनी चिडत असे. पिंकीला नवऱ्यापासून घटस्फोट घे म्हणून पाठीमागे लागला होता.

सनीचा त्रास दिवसेंदिवस वाढत चालला होता. यामुळे पिंकीने पोलिसांकडे तक्रार दाखल करण्याची धमकी दिली. सनी शुक्रवारी (ता. 28) सकाळी 10च्या सुमारास पिंकीला भेटायला तिच्या घरी आला. आपण दोघे पळून जाऊ असे तो म्हणाला. परंतु, पिंकीने त्याला स्पष्टपणे नकार दिला. यामधून दोघांमध्ये वाद झाले. संतापलेल्या सनीने चाकू बाहेर काढला व पिंकीवर सपासप सहा वार केले. पिंकी रक्ताच्या थारोळ्यात पडली. त्यानंतर सनीने स्वत:चा गळा चिरुन आत्महत्येचा प्रयत्न केला. दोघे रक्ताच्या थारोळयात पडले. यावेळी पिंकीचा चार वर्षाचा मुलगा घरात होता, त्याने झालेला सर्व प्रकार पाहिला. मोठमोठ्याने तो रडत होता. मुलाचा रडण्याचा आवाज ऐकून घरमालक आल्यानंतर ही घटना समोर आली. घरमालकाने पोलिसांना याबाबतची माहिती दिली. पोलिस घटनास्थळी आल्यानंतर त्यांनी दोघांना रुग्णालयात दाखल केले. डॉक्टरांनी पिंकीला मृत घोषित केले तर सनीवर उपचार सुरू आहेत. याबाबतचा पुढील तपास पोलिस करत आहेत.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com