बेळगावातून दिल्ली, मंगळूर विमानसेवा

सकाळ वृत्तसेवा
रविवार, 16 जून 2019

सांबरा - सांबरा विमानतळावरून स्पाईस जेट मुंबई विमानसेवा सुरू करणार आहे. त्याचबरोबर स्पाईस जेटकडून दिल्ली, मंगळूर, चेन्नई, सुरत, जबलपूर आदी शहरांना जोडणाऱ्या विमानसेवेला प्रारंभ करण्यात येणार आहे. त्यामुळे अवघ्या ४ ते ६ तासांत ही शहरे गाठणे शक्‍य होणार आहे.

सांबरा - सांबरा विमानतळावरून स्पाईस जेट मुंबई विमानसेवा सुरू करणार आहे. त्याचबरोबर स्पाईस जेटकडून दिल्ली, मंगळूर, चेन्नई, सुरत, जबलपूर आदी शहरांना जोडणाऱ्या विमानसेवेला प्रारंभ करण्यात येणार आहे. त्यामुळे अवघ्या ४ ते ६ तासांत ही शहरे गाठणे शक्‍य होणार आहे.

अत्यंत गरजेची असलेली मुंबई विमानसेवा गुरुवारपासून (ता. २०) सुरू होणार आहे. बंगळूरहून येणारे विमान बेळगावमार्गे मुंबईला जाणार आहे. तसेच परतीचा प्रवासही होणार आहे. त्यामुळे स्पाईस जेटची बेळगाव-बंगळूर मार्गावर रोज दोन विमाने ये-जा करणार आहेत. या फेऱ्या सुरू झाल्यानंतर देशातील महत्त्वाच्या शहरांना कनेक्‍टिंग विमानसेवा देणे शक्‍य होणार आहे.

मुंबईला जाणारे विमान पुढे जबलपूरपर्यंत जाणार आहे. त्यामुळे बेळगावहून अवघ्या ४ तासांत मुंबईमार्गे जबलपूर गाठणे शक्‍य होणार आहे. सायंकाळी बंगळूरकडे उड्डाण करणारे विमान पुढे मंगळूरला जाणार असल्याने अवघ्या ४ तासांत मंगळूरचा प्रवास शक्‍य आहे. राजधानी दिल्ली गाठणेही अवघ्या ६ तासांत शक्‍य होणार असून मुंबईमार्गे हा प्रवास उपलब्ध होणार आहे.

बंगळूर आणि हैदराबाद मार्गेही दिल्लीला ८ ते ९ तासात जाणे प्रवाशांना शक्‍य आहे. सध्या चेन्नईला थेट फेरी नाही. मात्र, बंगळूर आणि हैदराबाद मार्गे ५ ते ६ तासात चेन्नई गाठता येते. केरळच्या कोझिकोडलामार्गे बंगळूर ही सेवा ४ तासात उपलब्ध आहे.

व्यापाऱ्यांच्या दृष्टीने महत्वपूर्ण असणाऱ्या सुरतला मुंबईमार्गे ५ तासात पोचणे शक्‍य आहे. मध्यप्रदेशची राजधानी भोपाळ शहारालाही हैदराबादमार्गे अवघ्या ५ तासात कनेक्‍टिंग फेरी उपलब्ध होणार आहे. कोलकाता १० तासात, तर जयपूर, विजयवाडा १२ तासात गाठता येणे शक्‍य होणार आहे. ग्वाल्हेर, पटना, बागडोगरा, विशाखापट्टण या शहरांना १४ तासात पोचणे शक्‍य होणार आहे.


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Delhi, Mangalore flight from Belgaum