कपलचे अश्लील चाळे, तर रिल्ससाठी प्रवाशांना त्रास, VIRAL VIDEO नंतर मेट्रोत पोलीस घालणार गस्त | Delhi Metro | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

Delhi Metro news

Delhi Metro : कपलचे अश्लील चाळे, तर रिल्ससाठी प्रवाशांना त्रास, VIRAL VIDEO नंतर मेट्रोत पोलीस घालणार गस्त

Delhi Metro : दिल्ली मेट्रो रेल कॉर्पोरेशनने मेट्रोतील कपलचे अश्लील चाळे रोखण्यासाठी मोठे पाऊल उचलले आहे. गेल्या काही दिवसांपासून दिल्ली मेट्रो कपलसाठी अश्लील चाळे करण्याचा अड्डा बनला आहे. याचे अनेक व्हिडीओ देखील सोशल मीडियावर व्हायरल झाले होते. दरम्यान प्रवाशांच्या अश्लील व्हिडिओंवरून झालेल्या वादानंतर पोलीस आता साध्या वेशात मेट्रो स्टेशन आणि मेट्रो ट्रेनमध्ये गस्त वाढवणार आहेत.

सोशल मीडियावर समोर आलेल्या व्हायरल  व्हिडिओमध्ये मेट्रोच्या डब्यात बसलेले एक प्रेमळ जोडपे चुंबन घेताना दिसले होते. त्यामुळे डीएमआरसीने याप्रकरणी कारवाईसाठी दिल्ली पोलिसांना पत्र लिहिले होते.  

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, अशा कृत्यांमध्ये सामील असलेल्यांवर कठोर कारवाई केली जाईल. तसेच अश्लील व्हिडिओ अपलोड करणार्‍या व्यक्तींना कायद्याचे आणि इतर व्यक्तींच्या गोपनीयतेचे उल्लंघन करण्यासाठी देखील जबाबदार धरले जाईल.

डीएमआरसीच्या अधिकाऱ्याने सांगितले की लाईन-1 वरील काही जुन्या गाड्या वगळता सर्व मार्गावरील डब्यांमध्ये सीसीटीव्ही कॅमेरे आहेत. कोणत्याही आक्षेपार्ह हालचालींवर नजर ठेवण्यासाठी त्या डब्यांमध्ये आणि मेट्रो स्थानकांवर सीसीटीव्ही बसवले जात आहेत. यामुळे महिलांसह प्रवाशांना होणारे धोके आणि गैरसोय टाळण्यास मदत होईल.

मेट्रोच्या डब्यात चुंबन घेत असलेल्या जोडप्याच्या व्हिडिओने अनेक सोशल मीडिया वापरकर्ते संतप्त झाले आहेत ज्यांनी डीएमआरसीला कारवाई करण्याची विनंती केली आहे. डीएमआरसीने प्रवाशांना विनंती केली आहे की त्यांनी अशा घटनांची माहिती ताबडतोब जवळच्या उपलब्ध मेट्रो कर्मचारी/CISF ला द्यावी जेणेकरून योग्य ती कारवाई करता येईल.