मनी लाँड्रिंग प्रकरणी दिल्लीच्या आरोग्य मंत्र्यांना ईडीकडून अटक

जैन यांना कोलकाता-आधारित कंपनीशी संबंधित हवाला व्यवहाराशी संबंधित प्रकरणात अंमलबजावणी संचालनालयाने अटक केली आहे.
सत्येंद्र जैन
सत्येंद्र जैनसकाळ

नवी दिल्ली : दिल्लीचे आरोग्य मंत्री सत्येंद्र जैन (Satyender Jain) यांना कोलकाता-आधारित कंपनीशी संबंधित हवाला व्यवहाराशी संबंधित प्रकरणात अंमलबजावणी संचालनालयाने अटक केली आहे. आम आदमी पक्षाचे नेते सत्येंद्र जैन यांच्याविरुद्ध मनी लाँड्रिंगचे (Money Laundering Case) हे ईडी प्रकरण ऑगस्ट 2017 मध्ये केंद्रीय अन्वेषण विभागाने (CBI) त्यांच्या आणि इतरांविरुद्ध बेहिशोबी मालमत्ता बाळगल्याबद्दल नोंदवलेल्या एफआयआरशी संबंधित आहे. (Delhi Minister Satyendar Jain Arrested By ED )

अंमलबजावणी संचालनालयाने या वर्षी एप्रिलमध्ये सत्येंद्र जैन यांच्या कुटुंबाची आणि त्यांच्या कंपन्यांची 4.81 कोटी रुपयांची मालमत्ता मनी लॉन्ड्रिंगच्या चौकशीच्या संदर्भात जप्त केली होती. जैन हे दिल्ली सरकारमध्ये आरोग्य, ऊर्जा, गृह, सार्वजनिक बांधकाम विभाग (PWD), उद्योग, शहरी विकास, पूर, सिंचन आणि जलमंत्री आहेत. 2018 मध्ये, ईडीने या प्रकरणासंदर्भात शकूर बस्ती येथील आपच्या आमदाराची चौकशी केली होती.

सत्येंद्र जैन
मुसेवाला हत्या : "मारेकऱ्यांना सोडणार नाही"; केजरीवाल, मान यांची प्रतिक्रिया

मनीष सियोदियांकडून केंद्रावर घाणाघात

दरम्यान, मनी लाँड्रिंग प्रकरणी जैन यांना अटक करण्यात आल्यानंतर दिल्लीचे उपमुख्यमंत्री मनीष सिसोदिया यांनी प्रतिक्रिया देत केंद्रावर जोरदार हल्लाबोल केला आहे. ते म्हणाले की, जैन हिमाचलचे निवडणूक प्रमुख आहेत, ते तेथे जाऊ नये म्हणूनच जैन यांना अटक करण्यात आली आहे. हिमाचलमध्ये भाजपचा पराभव होत असून, त्याच द्वेशातून जैन यांना अटक करण्यात आली आहे. परंतु, हे प्रकरण पूर्णपणे खोटे असून ते लवकरच बाहेर येतील. केंद्र सरकार जैन यांच्या विरोधात 8 वर्षांपासून खोटी केस चालवत आहे. आतापर्यंत अनेक वेळा ईडीने चौकशीला बोलावले आहे. मधल्या अनेक वर्षात ईडीने चौकशीलादेखील बोलावणे बंद केले. कारण, त्यांना यात काहीच हाती लागले नाही. परंतु, आता या प्रकरणी पुन्हा एकदा चौकशी सुरू केली आहे. कारण जैन हे हिमाचलचे निवडणूक प्रभारी आहेत.

सत्येंद्र जैन
नारायण राणेंना CRZ प्रकरणी नोटीस; सुनावणीसाठी उपस्थित राहण्याचे आदेश

भ्रष्टाचाराचे आरोपानंतर पंजाबच्या मंत्र्याची हाकालपट्टी

काही दिवसांपूर्वी कंत्राटं देण्यासाठी अधिकाऱ्यांकडून 1 टक्का कमिशन मागितल्याच्या आरोपावरून पंजाबचे आरोग्य मंत्री विजय सिंगाला यांची तडकाफडकी मंत्रीमंडळातून हाकालपट्टी करण्यात आली होती. मुख्यमंत्री भगवंत मान (Bhagwant Maan) यांच्या या निर्णयानंतर दिल्लीचे मु्ख्यमंत्री अरविंद केजरीवाल (Arvind Kejriwal) यांनीदेखील मान यांचे कौतुक केले होते. त्यानंतर आता खुद्द केजरीवाल यांच्या मंत्रीमंडळातील मंत्र्याला अटक करण्यात आली आहे. त्यामुळे आता जैन यांचीदेखील मंत्रीमंडळातून हाकालपट्टी होणार का हे पाहणे महत्त्वाचे ठरणार आहे.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com