Kanjhawala Case : तरुणीला कारखाली फरफटत नेवून मारल्याप्रकरणी खूनाचा गुन्हा दाखल | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

Kanjhawala Case

Kanjhawala Case : तरुणीला कारखाली फरफटत नेवून मारल्याप्रकरणी खूनाचा गुन्हा दाखल

नवी दिल्लीः देशाला हादरवून सोडणाऱ्या कंझावला केसमध्ये आज मोठी अपडेट आलेली आहे. पोलिसांनी आरोपींविरोधात खूनाचा गुन्हा दाखल केलाय.

दिल्लीमध्ये १ जानेवारीच्या पहाटे एक घटना घडली होती. स्कुटीवर चाललेल्या एका तरुणीला कारने फरफटत नेलं. तब्बल १३ किलोमीटर तिला फरफटत नेलं होतं. यामध्ये तरुणीचा दुर्दैवी मृत्यू झाला होता.

हेही वाचाः भारतीयांनी जगाला डिजिटल पेमेंट शिकवायची आलीये वेळ...

या प्रकरणाध्ये अटक आरोपींवर लागलेल्या कलमांमध्ये वाढ करण्यात आलेली असून खूनाचं कलम वाढवण्यात आलेलं आहे. दिल्ली पोलिसांनी ही माहिती दिली.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, २० वर्षीय तरुणी अंजली हिला धडक देणं आणि कारखाली फरफटत नेवून मारणं याप्रकरणी आरोपींवर हत्येचं कलम ३०२ वाढवण्यात आलेलं आहे. सर्व रिपोर्टच्या आधारांवर हे कलम वाढवल्याचं पोलिसांनी सांगितलं.

हेही वाचा: Shivsena Symbol : 23 लाख शपथपत्र... ठाकरे गटाकडून 'ओळख परेड'ची मागणी

सुरुवातीला हत्येचं कलम लावण्यासाठी दिल्ली पोलिस धजावत नव्हती. कारण कोर्टात आरोप सिद्ध करणं मोठं चॅलेंज होतं. मात्र आता अनेक पुरावे पोलिसांना मिळाले आहेत. त्यावरुन बिदिक्कतपणे हत्येचं कलम लावण्यात आलेलं आहे.

दिल्ली पोलिसांनी सोमवारीच सत्र न्यायालयात भारतीय दंड संहितेचं कलम ३०२ वाढवण्यासासंबंधी माहिती दिली होती. पीपीआयने याबाबचं वृत्त दिलं आहे. या घटनेनंतर दिल्लीकरांमध्ये मोठा आक्रोश होता. आज पोलिसांनी आरोपींवर खुनाचं कलम वाढवल्याने मृत पीडितेला न्याय मिळेल, अशी आशा व्यक्त होत आहे.