"हे सरकार भाषण और आश्वासन, यही है मेरा शासन"

वृत्तसंस्था
शुक्रवार, 26 मे 2017

2 कोटी नोकऱ्यांचे काय झाले?

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी वर्षाला 2 कोटी नोकऱ्या निर्माण करण्याचे आश्वासन दिले होते. हे पूर्ण करण्यात संयुक्त पुरोगामी आघाडी तथा 'एनडीए' सरकार अपयशी ठरले आहे. त्यामुळे मोदी सरकारने रोजगार धोरणावर श्वेतपत्रिका सादर करावी.

- कमल नाथ

नवी दिल्ली : "भाजप समारंभांवर दोन हजार कोटी रुपये खर्च करत आहे. मोदी सरकारच्या तीन वर्षांचा कारभार थोडक्यात सांगायचा म्हणजे भाषण और आश्वासन, यही है मेरा शासन," अशी टिपण्णी काँग्रेसचे ज्येष्ठ नेते कमल नाथ यांनी केली. 

नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखालील सरकारला तीन वर्षे पूर्ण झाली आहेत. या पार्श्वभूमीवर प्रतिक्रिया व्यक्त करताना काँग्रेसने म्हटले आहे की, "भाजपप्रणित NDA सरकार म्हणजे केवळ भाषण आणि आश्वासनांच्या भोवती फिरते."

आसाममध्ये बांधण्यात आलेल्या देशातील सर्वात मोठ्या पुलाचे उद्घाटन पंतप्रधान मोदी यांच्या हस्ते आज होत असून, त्यानिमित्त भव्य समारंभाचे आयोजन करण्यात आले आहे. त्या संदर्भाने पत्रकार परिषदेत वार्ताहरांशी बोलताना कमल नाथ म्हणाले, "उसने अवसान, अलंकारिक भाषा आणि अतिशयोक्ती ही नरेंद्र मोदींच्या सरकारची ओळख तथा हॉलमार्क आहे."

कमल नाथ म्हणाले, "पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी वर्षाला 2 कोटी नोकऱ्या निर्माण करण्याचे आश्वासन दिले होते. हे पूर्ण करण्यात संयुक्त पुरोगामी आघाडी तथा 'एनडीए' सरकार अपयशी ठरले आहे. त्यामुळे मोदी सरकारने रोजगार धोरणावर श्वेतपत्रिका सादर करावी." 
 

Web Title: delhi news narendra modi govt bhashan aur aashwaasan, yeh hai mera shaasan kamal nath