दिल्लीत महिलेवर गाडीत सामूहिक बलात्कार करून फेकून दिले

सकाळ वृत्तसेवा
मंगळवार, 20 जून 2017

आरोपींनी दिल्लीच्या रस्त्यावर पूर्ण रात्रभर त्या महिलेवर सामूहिक बलात्कार केला, आणि सकाळी तिला ग्रेटर नोएडाच्या AWHO सोसायटीजवळ फेकून फरार झाले. 

गुरूग्राम / नोएडा : काही नराधमांनी ग्रेटर नोएडामध्ये चालत्या गाडीमध्ये एका महिलेवर सामूहिक बलात्कार करून तिला कासना येथे कारमधून फेकून दिले व फरार झाल्याची घटना समोर आली आहे. 

पोलिसांना मिळालेल्या माहितीनुसार, हरियानातील गुरूग्राम येथे हा दुष्कृत्य केले आणि पाडित महिलेला स्विफ्ट कारमधून ग्रेटर नोएडामध्ये आणून फेकून दिला. पीडित महिलेला ग्रेटर नोएडा येथील खाजगी रुग्णालयात भरती केले गेले आहे. या नराधमांनी हरियानाच्या सोहना (गुरुग्राम) येथून संबंधित महिलेचे अपहरण केले होते. आरोपींनी दिल्लीच्या रस्त्यावर पूर्ण रात्रभर त्या महिलेवर सामूहिक बलात्कार केला, आणि सकाळी तिला ग्रेटर नोएडाच्या AWHO सोसायटीजवळ फेकून फरार झाले. 

रस्त्याच्या कडेला बेशुद्ध अवस्थेत पडलेल्या या पीडित महिलेची खबर पोलिसांना आज (मंगळवार) सकाळी मिळाल्यानंतर तिला एका खाजगी रुग्णालयात दाखल करण्यात आले. घटनेची माहिती मिळाल्यावर जिल्हा पोलिस अधिकारीही घटनास्थळी दाखल झाले. पीडित महिला काल रात्री साडेआठ वाजण्याच्या सुमारास सोहना भागात गेली होती, तेव्हा स्विफ्ट गाडीतून आलेल्या काही लोकांनी तिला गाडीत ओढून घेतले आणि बलात्कार केला. महिलेचे वय 35 वर्षे आहे. त्या गाडीत तीनजण होते असे त्या महिलेने सांगितले. 
 

Web Title: delhi news a woman gangraped in moving car and thrown