दिल्लीत प्रदूषण रोखण्यासाठी 'सम-विषम' योजना लागू; होणार एवढा दंड

वृत्तसंस्था
सोमवार, 4 नोव्हेंबर 2019

पंजाब व हरियाना या शेजारील राज्यांमध्ये या काळात शेतकरी शेतातील कचरा जाळत असल्याने संपूर्ण उत्तर प्रदेशात धुराचे ढग पसरत असल्याने केजरीवाल यांनी या दोन राज्यांवर टीका केली आहे. दिल्लीतील नागरिकांनी सम-विषम योजनेचे पालन करावे असे आवाहन केजरीवाल यांनी केले आहे.

नवी दिल्ली : दिल्लीतील प्रदूषण रोखण्यासाठी मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांनी आजपासून (सोमवार) सम-विषम (Odd-Even) योजना लागू केली आहे. या नियमांचे उल्लंघन करणाऱ्यांना चार हजार रुपयांपर्यंत दंड होणार आहे. 

दिल्लीतील हवेची तुलना मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांनी 'गॅस चेंबर'शी केली आहे. शालेय विद्यार्थ्यांना श्‍वासोच्छ्वासासाठी मास्कचे वाटप केजरीवाल यांनी आज केले आहे. दिल्लीच्या मुख्यमंत्र्यांसह सर्वजण हा नियम पाळणार आहेत. दिल्लीतील प्रदूषणाची तीव्रता कायम राहिल्याने पुन्हा एकदा राजधानीचा श्‍वास गुदमरल्याचे पाहायला मिळत आहे. दिल्लीतील अनेक ठिकाणांवर आज हवेच्या गुणवत्तेचा निर्देशांक हा धोक्‍याच्या पातळीवर पोचलेला आहे. दिल्लीमध्ये नव्याने येणाऱ्या वाऱ्यामुळे प्रदूषणकारी घटक येथे दाखल होत असल्याचे तज्ज्ञांनी म्हटले आहे. 

पंजाब व हरियाना या शेजारील राज्यांमध्ये या काळात शेतकरी शेतातील कचरा जाळत असल्याने संपूर्ण उत्तर प्रदेशात धुराचे ढग पसरत असल्याने केजरीवाल यांनी या दोन राज्यांवर टीका केली आहे. दिल्लीतील नागरिकांनी सम-विषम योजनेचे पालन करावे असे आवाहन केजरीवाल यांनी केले आहे.

काय आहेत सम-विषम योजनेचे नियम -
- दिल्लीत 4 नोव्हेंबर ते 15 नोव्हेंबरदरम्यान ही योजना सुरु राहणार
- तुमच्या कारचा शेवटचा नंबर सम (Odd) किंवा विषम (Even) यावरून ही योजना लागू होते
- सोमवार ते शनिवार दरम्यान ही योजना लागू, रविवारी सुटी राहील
- खासगी वाहतुकीला हा नियम लागू होत नाही. उदा. ओला, उबर.
- या नियमांचे उल्लंघन केल्यास 4 हजार रुपयांपर्यंत दंड भरावा लागणार
- दिल्लीच्या मुख्यमंत्र्यांसह सर्वच मंत्र्यांना हा नियम लागू आहे
- सीएनजी वाहनांना यातून सूट देण्यात आली आहे.


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Delhi odd-even scheme begins as air quality dips to 3-year low