
Video: होय मारलं त्याला, कारण तो...; पत्नीचा धक्कादायक खुलासा Delhi Murder
Pandav Nagar Murder Case: दिल्लीतल्या श्रद्धा मर्डर केसचा तपास सुरु असतांना आणखी धक्कादायक घटना घडली आहे. पत्नी आणि मुलाने मिळून पतीचा खून केला. एवढंच नाही तर मृतदेहाचे १० तुकडे करुन दिल्लीच्या वेगवेगळ्या भागांमध्ये फेकून दिले.
देशाला हादरवून सोडणारी ही दुसरी घटना दिल्लीतल्या पांडव नगर भागामध्ये घडली आहे. मुलासोबत मिळून पत्नीने पती अंजन दासची हत्या केली. आरोपी पत्नीचं नाव पूनम आहे. आरोपीने कॅमेऱ्यासमोर पतीच्या खूनाचं कारणदेखील सांगितलं.
''तो मुलांसोबत चुकीचं वागत होता आणि वाईट नियत ठेवत होता'' असा खुलासा आरोपी पत्नीने केला आहे. शिवाय पतीला मी मारलं नसून मुलाने मारल्याचं तिने सांगितलं.
ही हत्येची घटना ३० मे रोजी ही घडली होती. पोलिसांच्या माहितीनुसार, पत्नी आणि मुलाने मिळून अंजन दसच्या मृतदेहाचे १० तुकडे केले होते. त्यानंतर त्या तुकड्यांना फ्रुजमध्ये ठेवलं. ५ जून रोजी काही तुकडे कल्याणपुरी, रामलीला मैदानात एका बॅगमध्ये सापडले. पूनम आणि मुलगा दीपकने एकेक करुन पूर्व दिल्लीतील वेगवेगळ्या भागांमध्ये त्या तुकड्यांची विल्हेवाट लावली आणि शीर पुरून टाकलं.