जेरबंद होताच ACP च्या मुलीची मुजोरी उतरली; वाचा नेमकं काय घडलं | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

Crime News

जेरबंद होताच ACP च्या मुलीची मुजोरी उतरली; वाचा नेमकं काय घडलं

नवी दिल्ली - साकेत मॉलमधील पार्किंग कर्मचार्‍यांच्या अंगावर कार घालणार्‍या एसीपीच्या मुलीला पोलिसांनी आज अखेर अटक केली आहे. यासोबतच पोलिसांनी कारही जप्त केली आहे. कर्मचाऱ्याच्या अंगावर गाडी घातल्याची बातमी प्रसारमाध्यमांमध्ये आल्यानंतर पोलिसांनी चार दिवसांनी एफआयआर नोंदवला. त्यानंतर आता पोलिसांनी आरोपी तरुणीला अटक केली आहे. (Crime news in Marathi)

हेही वाचा: Ajit Pawar: राज ठाकरे, फडणवीस, एकनाथ शिंदे यांच्या एकत्र येण्यावर अजित पवार यांची प्रतिक्रिया म्हणाले...

आरोपी तरुणीने 16 ऑक्टोबर रोजी दिल्लीतील साकेत मॉलमध्ये पार्किंग कर्मचाऱ्याच्या पायावरून कार घातली होती. त्यात कर्मचारी जखमी झाला होता. या अपघातात त्याचा जीवही जाऊ शकत होता. यानंतर पीडितेला रुग्णालयात दाखल करण्यात आले. उपचारादरम्यान प्रकरण दाबण्याचा खूप प्रयत्न करण्यात आले. मात्र हे प्रकरण माध्यमांसमोर येताच पोलिसांना गुन्हा नोंदवावा लागला.

हेही वाचा: Reservation : निवडणुकीपूर्वी काश्मीरमध्ये मोठा बदल; पाकिस्तानी निर्वासितांसह 15 जातींना मिळणार 'आरक्षण'

20 ऑक्टोबर रोजी आरोपी तरुणीविरुद्ध आयपीसीच्या कलम 279 आणि 337 अंतर्गत एफआयआर नोंदवण्यात आला. यानंतरही आरोपी तरुणीला अटक करण्यासाठी पोलिसांना दोन दिवस लागले.