अबब! तीन बायका, 10 कोटींचा व्हिला; भारतातील सर्वात लॅव्हिश चोराला बेड्या | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

Car Thief Anil Chauhan

अबब! तीन बायका, 10 कोटींचा व्हिला; भारतातील सर्वात लॅव्हिश चोराला बेड्या

Delhi Police Arrest Biggest Car Thief Anil Chauhan : भारतातील सर्वात लॅव्हिश लाईफस्टाईल म्हणून परीचित असणाऱ्या सर्वात मोठ्या वाहन चोराला दिल्ली पोलिसांनी बेड्या ठोकल्या आहेत. तीन महिन्यांहून अधिक काळ सततचा पाठपुरावा केल्यानंतर पोलिसांना या चोराला जेरबंद करण्यात यश आले आहे. या भामट्याकडे 10 कोटींचा व्हिला तीन बायका आणि पाच हजार गाड्या आहेत. अनिल चौहान असे अटक केलेल्या चोराचे नाव आहे.

हेही वाचा: संजय राऊतांना भेटण्यास ठाकरेंना परवानगी नाकारली, पण...

23 ऑगस्टला पोलिसांना चौहान दिल्लीत असून सहकाऱ्यांसोबत चोरी करण्याच्या तयारीत असल्याची माहिती मिळाली. त्यानुसार पोलिसांनी सापळा रचून अनिलला अटक केली. यावेळी त्याच्याकडून पिस्तूलसहित अटक केली. त्याच्याकडे एकूण पाच पिस्तूलं आढळून आली. अनिल गाड्या चोरी करण्यासाठी विमानाने प्रवास करायचा. गाडीची चोरी केली की तो पुन्हा विमानानेच माघारी जायचा असे पोलिसांनी सांगितले.

अनिलला महागडे कपडे, सोन्याचे ब्रेस्लेट आदी परिधान करण्याची आवड होती. अटक टाळण्यासाठी अनिल महागड्या गाड्यांमधून फिरत असे. तसेच आपण व्यवसायिक किंवा सरकारी अधिकारी असल्याचे तो इतरांना भासवत होत. एवढेच नव्हे तर, अनिल कंत्राटदार होता आणि आसाम सरकारसोबत तो काम करत होता. त्यामुळे त्याच्या तेथे अनेक ओळखी होत्या असे पोलिसांनी सांगितले.

हेही वाचा: भाजपमुळे मुख्यमंत्री शिंदेंच्या सुपुत्राची जागा धोक्यात ?

चौहान याने गंगटोक, आसाम, नेपाळ आणि इतर अन्य ठिकाणी 25 ते 30 सहकाऱ्यांच्या मदतीने या गाड्यांची विक्री केली. त्याला याआधीही अटक करण्यात आली होती. अटक टाळण्यासाठी तो महागड्या गाड्यांमधून फिरत असे. आपण व्यवसायिक किंवा सरकारी अधिकारी असल्याचं तो भासवत असे. गाड्यांच्या चोरीसोबतच चौहान शिंगांसाठी गेंड्यासारख्या दुर्मिळ प्राण्यांची शिकारही करत होता. या तस्करी प्रकरणी ईडीने याप्रकरणी चौहानचा 10 कोटींचा व्हिला आणि इतर संपत्ती जप्त केली आहे.

चौहानला तीन पत्नी आणि सात मुले असून,. ईडीच्या छापेमारी आणि अटकेनंतर ते त्याला सोडून गेले होते. तर, दोन पत्नींनी अनिलच्या गुन्ह्यांबद्दल काही माहिती नसल्याचा दावा केला आहे. रेकॉर्डनुसार, 1990 मध्ये चौहानने चोरी करण्यास सुरुवात केली असून, अनेक प्रकरणांमध्ये त्याला दोषी ठरवण्यात आले अशी माहिती डीसीपी श्वेता चौहान यांनी दिली आहे.

Web Title: Delhi Police Arrested India Biggest Car Thief Anil Chauhan

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..