esakal | 'किस करेन पण मास्क घालणार नाही'; भररस्त्यात महिलेने दिली पोलिसांना धमकी

बोलून बातमी शोधा

'किस करेन पण मास्क घालणार नाही'; भररस्त्यात महिलेने दिली पोलिसांना धमकी
'किस करेन पण मास्क घालणार नाही'; भररस्त्यात महिलेने दिली पोलिसांना धमकी
sakal_logo
By
टीम ई सकाळ

देशात सध्या कोरोनाची दुसरी लाट आल्यामुळे या काळात काळजी घेणं अत्यंत गरजेचं आहे. मास्क लावणे आणि सोशल डिस्टंसिंगच्या नियमांचं पालन करणे हे सक्तीचं झालं आहे. प्रशासन व वैद्यकीय क्षेत्रातील कर्मचारीदेखील वारंवार याविषयी नागरिकांना सतर्क करत आहेत. मात्र, काही जण नियमांकडे दुर्लक्ष करुन राजरोसपणे फिरताना दिसतात. आतापर्यंत मास्क न लावता घराबाहेर पडलेल्या अनेकांकडून पोलिसांनी दंड आकारला आहे. मात्र, काही ठिकाणी या कारवाईला विरोध केला जात आहे. यामध्येच दिल्लीतील एका महिलेने मास्क घालण्यावरुन थेट पोलिसांसोबत हुज्जत घातली आहे. इतकंच नाही तर एकवेळ किस करेन, पण मास्क लावणार नाही असं या महिलेने भररस्त्यात पोलिसांना म्हटलं आहे.

दिल्लीतील दर्यागंज येथे हा प्रकार घडला असून एका महिलेने व तिच्या पतीने मास्क न लावल्यामुळे पोलिसांनी त्यांना अडवलं. यावेळी आपली चूक मान्य करण्याऐवजी ही महिला पोलिसांसोबत वाद घातल बसली. विशेष म्हणजे या महिलेने पोलिसांसोबत चुकीच्या पद्धतीने भाष्य केल्यामुळे सोशल मीडियावर चर्चा रंगली आहे.

हेही वाचा: सावधान! चीज खाल्ल्यामुळे होतो सेक्स लाइफवर परिणाम

सध्या दिल्लीतील कोरोनाची परिस्थिती चिंताजनक असल्यामुळे तेथे मास्क वापरणं सक्तीचं केलं आहे. तसंच जागोजागी पोलिस तैनात करण्यात आले असून प्रवास ककरणाऱ्या प्रत्येक व्यक्तीची तपासणीदेखील करण्यात येत आहे. यामध्येच एक महिला तिच्या पतीसोबत कारने प्रवास करत होती. मात्र, यावेळी या जोडप्याने मास्क न घातल्यामुळे पोलिसांनी त्यांना वाटेत अडवलं. यावरुन संतापलेल्या महिलेने पोलिसांवर अरेरावी करत शिवराळ शब्दात त्यांच्याशी वाद घातला. इतकंच नाही तर मास्क घालणार नाही, काय कराल असा उलट सवालही तिने विचारला.

'कोरोनाच्या नावाखाली आम्हाला त्रास देण्यात येत आहे. मी मास्क लावणार नाही, काय कराल?' असा प्रश्न विचारत तिने थेट नवऱ्याकडे बोट दाखवलं आणि 'हा माझा नवरा आहे, माझ्या मनात आलं तर मी त्याला इथे किसही करेन', असं म्हणाली. तिच्या या वक्तव्यानंतर सोशल मीडियावर हा व्हिडीओ तुफान व्हायरल झाला आहे. इतकंच नाही तर, पोलिसांसमोर उद्घटपणे बोलल्यामुळे अनेकांनी तिच्यावर टीकास्त्र डागलं आहे.

दरम्यान, या घटनेनंतर पोलिसांनी संबंधित महिला व तिच्या पतीला अटक केली असून या दोघांवर दिल्ली डिस्जामेंट एमएमएसटीअंतर्गंत तक्रार दाखल करण्यात आली आहे. विशेष म्हणजे या दोघांनाही अटक झाल्यानंतर पतीने त्याच्या पत्नीवर काही आरोप केले आहेत. पत्नीच्या हाट्टामुळेच मी मास्क लावला नव्हता असं त्याने सांगितलं.